spot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ शुभांगी साळोखे यांचा प्रबंध सादर

लोणी दि.१२( जनता आवाज वृत्तसेवा ):-आनंद विद्यापीठ गुजरात येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये लोणी येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका शुभांगी साळोखे यांनी रिसेंट फ्रेंड्स अँड इनोव्हेशन इन एग्रीकल्चरल मार्केट इंटेलिजन्स या विषयावर प्रबंध सादर करण्यात आला.

सदर आंतरराष्ट्रीय परिषद, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ ऑस्ट्रेलिया,नॅशनल एग्रीकल्चरल हायर एज्युकेशन प्रोजेक्ट, इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चरल रिसर्च आणि आनंद विद्यापीठाचे इंटरनॅशनल ऍग्री बिजनेस मॅनेजमेंट कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.आंतरराष्ट्रीय परिषदेतील सहभागाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,प्राचार्य डॉ अनिल बेंद्रे, प्राचार्य डॉ. विशाल केदारी, प्रा. चंद्रकला सोनवणे यांनी अभिनंदन केले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!