लोणी दि.१५( जनता आवाज वृत्तसेवा ):-विद्यार्थ्यांच्या कला गुणांसह बौध्दीक क्षमतेला चालना देण्यासाठी गणित, विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शन हे महत्वपूर्ण ठरते. विद्यार्थ्यांना या माध्यमातून अनुभवाचे ज्ञान मिळताना त्यांच्यातील आत्मविश्वास वाढत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात पंचायत समिती राहाता व तालुका गणित विज्ञान अध्यापन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचे उदघाटन सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रवरा सहकारी बँकेचे माजी संचालक मारुती गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रवरा बॅकचे संचालक ॲड. काकासाहेब गोरे,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वैजयंती धनवटे, संरपंच सौ संगीता पठारे, उपसरपंच डॉ सोमनाथ गोरे,संजय गोरे,राहुल गोरे,रामजी लोळगे,जिल्हा शिक्षण अधिकारी अशोक कडूस, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू कांबळे,गटशिक्षणाधिकारी अधिकारी राजेश पावसे,सौ लीलावती सरोदे,प्रा.नंदकुमार दळे, वैशाली रोकडे,संजय उंबरकर,सुरेश विखे यांच्या सह शिक्षक,विध्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ. शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रात जिल्हा हा आघाडीवर आहे. वेगवेगळ्या उपक्रमामुळे तालुकातील विद्यार्थी हा प्रगती करत आहे. गणित विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यामधील संशोधन संधीला दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून मांडलेली अनेक प्रयोग दिशादर्शक आहेत. सेंद्रीय शेती, बहुउपयोगी काठी, शेतीपुरक अवजारे,सोलर, ऊर्जा बचत,घन कचरा व्यवस्थापन,ब्रेक असलेली बैल गाडी असे विविध प्रयोग याव्दारे संशोधन वृत्तीसह रोजगार निर्मीतीची उपकरण तयार करण्याला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षकांनी विद्यार्थी जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर कसा पोहचले यासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी राजेश पावसे यांनी करतांना या प्रदर्शनाचा आढावा घेतला. यानिमित्ताने तालुका स्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षक संचालिका सौ. लिलावती सरोदे यांना देण्यात आला. आदर्श मुख्याध्यक म्हणून दिपक डेंगळे, भारती देशमुख, संजय राठोड, कृतिशील शिक्षक विठ्ठल कुटे, भिमराज चिंधे, भामरे तर जिल्हा पातळीवरील पुरस्कार प्राप्त विद्यार्थी स्मरणिका दळे, भक्ती कसाब, यश खाडे, कुंभकर्ण, वैष्णवी घोरपडे, श्रृतिका गायकवाड, वेदांगी तांबे, नितीन सोनवणे, नक्ष पालीमकर यांचा गौरव करण्यात आला. दोन दिवसीय प्रदर्शनात ९८ शाळेतील २९९ विविध प्रयोग या प्रदर्शनात आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुनिल आढाव आणि प्रा. सुनिल कोळपकर यांनी तर आभार प्रा.संजय उंबरकर यांनी मानले
राजुरी येथे पंचायत समिती राहाता व तालुका गणित विज्ञान अध्यापण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता तालुका गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शन चे उदघाटन जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गुणवंत शिक्षण गौरव पुरस्कार लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांना देण्यात आला. याशिवाय कृतीशिल,उपक्रमशिल पुरस्कार प्रदान करण्यित आले.
याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे संचालक मारुती गोरे, काकासाहेब गोरे, संरपंच सौ संगीता पठारे, उपसरपंच डॉ सोमनाथ गोरे,संजय गोरे,राहुल गोरे, वैजयंती धनवटे,रामजी लोळगे,जिल्हा शिक्षण अधिकारी अशोक कडूस, प स गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू कांबळे,गटशिक्षणाधिकारी अधिकारी राजेश पावसे,सौ लीलावती सरोदे,प्रा.नंदकुमार दळे,यांच्या सह शिक्षक,विध्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.