नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एन. बी. ए. (नॅशनल बोर्ड ऑफ अंँक्रेडिटेशन) विषयावर आधारीत पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक १८ ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये केले असून नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडिएशनच्या मानांकनाच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी काही तज्ञ मंडळी या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये महाविद्यालयास भेटी देणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी दिली.
या कार्यशाळेअंतर्गत अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक अशा तांत्रिकी व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता पडताळणी, त्याचे निकष व परिणामांचे मूल्यांकन या विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास डॉ. एस. आर. कुचेकर ( प्राचार्य, संजीवनी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, कोपरगाव) हे प्रमुख पाहुणे असणार आहेत त्याचबरोबर डॉ. पी. एन. नागरे (अमृतवहिनी कॉलेज, संगमनेर), डॉ. प्रवीण कचरे (जे. एस. पी. एम. कॉलेज, वाघोली), डॉ. बी. जे. पर्वत (एन. डी. एम. व्हि. पी. कॉलेज, नाशिक), डॉ. रवींद्र नवथार (डी. व्ही. व्ही. पी. कॉलेज, विळद घाट) यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती राहणार आहे. विविध महाविद्यालयांना ‘एनबीए’चे मानांकन मिळवण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सर्व प्रमुख मार्गदर्शकांशी संपर्क साधून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या तत्रंज्ञानाचा वापर, विविध माहितीचे संकलन, सध्य परिस्थितीत उद्भवत असलेल्या विविध शैक्षणिक व तांत्रिक समस्यांचे निराकरण यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन मिळणार आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रामचंद्र दरे साहेब, सचिव मा. श्री जी. डी. खानदेशे साहेब, सहसचिव ॲडव्होकेट श्री. विश्वासराव आठरे पाटील साहेब, खजिनदार मा. डॉ. विवेक भास्कर साहेब आणि संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच सदस्य या सर्वांनी १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्यासह संबंधित महाविद्यालयांच्या शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी केले आहे. महाविद्यालयांना या कार्यशाळेमुळे एनबीएचे मानांकन मिळवण्यासाठी निश्चितच फायदा होणार असल्यामुळे इच्छुक महाविद्यालयांनी यासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेचे आयोजन करण्यामध्ये एन.बी. ए. समन्वयक प्रा. ए. बी. काळे (मेकॅनिकल विभागप्रमुख) आणि सहसमन्वयक प्रा. डी. डी. देसले यांनी सूत्रबद्ध नियोजन केले असून सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले, ई अँड टी सी विभाग प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, ए.आय. विभागप्रमुख एस. आर. पवार हे सर्व विभागप्रमुख नियोजन समिती मध्ये सहभागी आहेत.



