कोल्हार दि.१५( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघटना आयोजित विज्ञान स्पर्धेमध्ये लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूलची विद्यार्थिनी स्मरणिका नंदकुमार दळे हिने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे .
राहाता तालुक्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर विज्ञान स्पर्धेसाठी निवड झाली .या विज्ञान स्पर्धेमध्ये स्मरणिका दळे हिने तृतीय क्रमांक पटकावला . तिला विद्यालयाचे शिक्षक पी.जे. काळे ,सौ कविता कडू ,विद्यालयाचे प्राचार्य सुधीर मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,संस्थेचे अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,प्रा.नंदकुमार दळे यांनी अभिनंदन केलै आहे.



