पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):- काल भाजप नेत्या व आमदार गीता जैन यांनी महानगरपालिकेतील एका ठेकेदारी अभियंता यांना चुकीच्या ठिकाणी केलेल्या अतिक्रमण का केले तेथील तुम्हाला लहान मुले व महिला दिसल्या नाही का या प्रकारचा जबाब विचारत असताना त्यांचा स्वतःवरचा संयम सुटला आणि त्यांनी महानगरपालिकेचे ठेकेदारी अभियंता याच्या श्रीमुखात लगावली.
लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. कधीतरी संताप होऊ शकतो, एखाद्या गोष्टीत राग अनावर होऊ शकतो. तरीही लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं हेच योग्य आहे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे.
विरोधी पक्षाकडून हा सत्तेचा माज असल्याची टीका सरकार आणि भाजप आमदारांवर केली जात आहे. यासंदर्भात आमदार गीता जैन यांनी स्पष्टीकरण देताना मी कुठेही चुकीचं केलेलं नाही. याउलट संबंधित अभियंत्यांनी चुकीच्या पद्धतीने बिल्डरच्या साांगण्यावरुन कारवाई केल्याचं म्हटलं. याबाबत, उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार गीत जैन यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. कधीतरी संताप होऊ शकतो, एखाद्या गोष्टीत राग अनावर होऊ शकतो. तरीही लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं हेच योग्य आहे, असे स्पष्ट शब्दात फडणवीस यांनी म्हटलं. फडणवीसांनी आमदार जैन यांच्या कृतीचं कुठलंही समर्थन केलं नाही. पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली.