लोणी दि.१८( जनता आवाज वृत्तसेवा ):-शिक्षणासोबतचं मुलांना व्यावहारीक ज्ञानाची देखिल गरज आहे. प्रवरेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणांसोबतचं विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे काम होत आहे. चिमुकल्यांनी भरवलेला हा आनंद बाजार सर्वासाठी महत्त्वपूर्व असल्याचे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी येथे आयोजित केलेल्या बाल आनंद मेळाव्यात सौ. सरोदे बोलत होत्या. यावेळी प्राचार्या भारती कुमकर, सिमा बढे, प्रवरा गर्ल्स इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या रेखा रत्नपारखी, भिमराज चिंधे,अनिल लोंखडे,विद्याताई घोरपडे, आदी सह शिक्षक पालक उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. सरोदे म्हणाल्या, प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थासाठी नेहमीचं विविध उपक्रम सुरु असतात. जिल्हा परिषदेच्य माजी अध्यक्षा सौ शालीनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षापासून बाल आनंद मेळावा सुरु आहे. शिक्षणासोबतचं विद्यार्थ्यांना व्यावहारीक ज्ञान मिळत आहे. या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळत आहे. मुलींनी व्यवसायाची मांडणी, हिशोब, मार्केटींग संवादकौशल्य यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरले असे सांगितले.
मुलींनी या बाल आनंद मेळाव्यात विविध खाद्य पदार्थ, भाजीपाला, फळे आदींची विक्री करून हजारो रुपयांची उलाढाल केली.
काही तासात संपला माल……
प्रवरेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सामान्य शेतकरी कुंटूंबातील आहे. आपल्या शेतातील भाजीपाला विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवला होता. याला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद देत काही तासात विक्री करत शेतमाल विक्रीचे प्रत्यक्ष धडेच घेतले.