सात्रळ,२१( जनता आवाज
वृत्तसेवा ):-येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सात्रळ (ता. राहुरी) महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, डॉ. जयश्री सिनगर, कार्यालयीन अधीक्षक श्री. विलास शिंदे, श्री. महेंद्र तांबे, प्राध्यापक-प्राध्यापिका व सेवक वृंद उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रभाकर डोंगरे यांनी उपस्थितांना दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व सोदाहरण समजावून सांगितले. जिमखाना विभागप्रमुख प्रा. मधुकर वाणी यांनी योग प्रात्यक्षिक व सराव करून घेतला. प्रा. सोमनाथ बोरुडे यांनी उपस्थितांना प्राणायामाचे धडे दिले. प्रा. डॉ. अनंत केदारे यांनी आभार मानले.