spot_img
spot_img

न्यू इग्लिश स्कूल टाकळीभान शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

टाकळीभान ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथील न्यू इग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यायात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या  उत्साहात  पार पडले.

या स्नेहसंमेलना प्रसंगी सा रे ग म पा लिटील चॅम्स  उपविजेता स्वर संम्राट कुमार जयेश विश्वास खरे हा बाल कलाकार प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. तर राहुल उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थीतीत तर आदर्श शिक्षक लक्ष्मणराव कदम(गुरूजी), रयतचे जनरल बाँडी सदस्य बापुसाहेब पटारे, स्कूल कमिटीचे सदस्य राहुल पटारे , भारत भवार, पाराजी पटारे ,सचिन माने, अनिता तडके, माजी शिक्षका रंजना देठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, उपस्थितीत होते.

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य, सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. संगीताच्या तालावर विविध प्रकारच्या गाण्यावर ठेका धरत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दिवसभर सादर झालेल्या या कार्यक्रमास विविध प्रकारचे गुणदर्शन सादर केलेल्या कलेच्या माध्यमातून उपस्थितांनी अनूभवले.

सर्वच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणाने उपस्थित भाराऊन गेले होते. यामध्ये प्रामुख्याने “झुलवा पाळणा बालशिवाजीचा” तसेच शिवराज्याभिषेक या सादरीकरणाणे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी—विद्यार्थीनींनी विविध प्रकारची ज्या त्या गीताला साजेल अशी वेशभूषा परिधान करून आपआपले गीत सादर करून आपल्यात दडलेल्या सुप्त अशा कलागुणांचे दर्शन उपस्थितांना करून दिले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या कलागुणांना मोठ्या प्रमाणात दाद मिळाली. या वार्षिक स्नेहसंमेलनास मोठ्या संख्येने पालक वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य बी.टी.इंगळे, पर्यवेक्षक ए.डी.बनसोडे तसेच सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!