परळी (जनता आवाज वृत्तसेवा):- पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मंगळवारपासून २० या रोजी बीडमध्ये ‘संपर्क से समर्थन’ या अभियान सुरु केलं आहे. या मोहिमेच्या निमित्ताने त्यांनी परळीतील ग्रामस्थ, छोटे व्यापारी आणि दुकानदारांच्या भेटीगाठी घेतल्या.त्यांच्या या अभियानाला मोठा प्रतिसादही मिळत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या मोहिमेला पाठिंबा देत त्यांच्या अडचणी आणि समस्याही पंकजा मुंडेंसमोर मांडल्या. यावर पंकजा मुंडे यांनी बीड मधील जनतेची सर्व प्रश्न ऐकून घेऊन सर्वांच्या प्रश्नाचे निरसरण होईल अशी ग्वाही दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘संपर्क से समर्थन’ ही मोहीमची पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी येथे सुरुवात
पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला बळ मिळाल्याचं लवकरच दिसेल’; भाजप नेत्याचं मोठं विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
संकल्पनेतून’संपर्क से समर्थन’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. राज्यात भाजपकडून 20 ते 30 जून या काळात ही मोहीम राबवली जाणार आहे. यानुसार पंकजा मुंडेंनी कालच परळीतून या मोहिमेला सुरुवात केली.परळीतील सर्व सामान्य नागरिकांपासून ते भाजी विक्रेता, लाँड्रीवाला, फुल विक्रेते यांच्याशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला.मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात राज्यात केलेल्या कामगिरीचा आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. पंकजा मुंडेंनी स्वत: आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या अभियानाच्या निमित्ताने मोदी सरकारच्या कामगिरीचा गेल्या नऊ वर्षातील लेखाजोखा मांडणारे पॅम्पलेट परळीतील दुकानदारांना वाटले.
3 जून रोजी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. गेल्या 4 वर्षामध्ये अनेक खासदार आणि आमदार झाले आहेत. पण मी पात्र नसेल तर चर्चा होणारच, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर पंकजा मुंडेंना पुन्हा त्यांना नाराजीबाबत विचारले असता, ”मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन,” अशी सूचक प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. विधान पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांनी जोर धरला आहे. याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये आमदार धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यातील जो दुरावा होता. त्यामध्ये काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. कारण असे की, कालच परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे निवडणुक बिनविरोध होऊन दोन्ही नेत्याने सहकार मध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नको.