spot_img
spot_img

विनायक विद्या मंदिर पारनेर शाळेचे गणित विज्ञान प्रदर्शनात यश

पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- पंचायत समिती पारनेर (शिक्षण विभाग) व गणित विज्ञान अध्यापक संघटना, पारनेर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ वे गणित विज्ञान, पर्यावरण प्रदर्शनामध्ये तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.

यामध्ये विद्यार्थ्यांनी गणित विज्ञान आणि पर्यावरण या विषयांतर्गत विविध प्रकारचे मॉडेल सादर केले. या प्रदर्शनात विनायक विद्या मंदिर पारनेर शाळेतील इयत्ता दुसरी तील विद्यार्थीनी तेजस्वी युवराज दिवटे हिने गणित विषयाच्या इयत्ता १ ते ५ या गटात द्वितीय क्रमांक आणि इयत्ता चौथी मधील स्नेहा सुनील रासकर हिने विज्ञान विषयाच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला त्या बद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिकराव औटी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!