spot_img
spot_img

पर्यटकांना आकर्षित ठरणाऱ्या सांधन व्हॅलीत एका तरुणीचा पाय घसरून दुर्दैवी मृत्यू

राजूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- अकोले तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित ठरणाऱ्या सांधन व्हॅलीत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. पर्यटनासाठी आलेल्या चार तरुणींच्या समूहातील एका तरुणीचा पाय घसरल्याने दगडावर डोके आपटून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. सदरची तरुणी मुंबईतील दहिसर येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी मुंबईतील चार तरुणींचा समूह सकाळीच साडे सहा वाजता दाखल झाला होता. भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर चौघींचा ग्रुप हा सांधण दरीत गेले. पर्यटन व निसर्गाचा आनंद लुटत असताना यामधील ऐश्वर्या खानविलकर (वय 24 वर्षे, रा. दहिसर, मुंबई) या तरुणीचा एका खडकावरुन पाय घसरल्यामुळे ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडल्याने तिचे डोके खडकावर आपटल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राजुर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला असून अकोले ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केला आहे. अकोले ग्रामीण रुग्णालयात पंचनामा करण्याचे काम सुरु असून याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल डगळे हे करीत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!