कोपरगाव ( जनता आवाज
वृत्तसेवा ):- कोपरगाव येथील एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आलेली दर्शना दत्तू पवार या नावाच्या युवतीचा वेल्हा तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. ती आणि तिचा एक मित्र ट्रेकिंगला गेले आणि त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अचानक राजगडाच्या पायथ्याची मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तर तिच्याबरोबर गेलेल्या मित्राचा अजून ठाव ठिकाणा पोलीसांना मिळालेला नाही. सदर मयत झालेली युवती अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी आहे.
त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याचदरम्यान आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून तिचा खून झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहे. यामुळेच तिचा मृत्यू झाला नसून तिची हत्या करण्यात आल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट होत आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
मयत दर्शना बरोबर असणारा तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे हा अद्यापही फरार असून त्याचा मोबाईल तो स्विच ऑफ दाखवत आहे. परंतु लोकेशन चेक केल्यास ते पर राज्यात दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी काल पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मयत दर्शनाला लवकरात लवकर न्याय मिळावा. याप्रकरणीदोषी असणाऱ्यावर
कारवाई करावी.