spot_img
spot_img

तालुक्याला चांगल्या फलंदाजांची गरज,फिल्डीगचे माझ्यावर सोडा-विखे पाटील  एकच संघ निश्चित करण्याचा जनार्दन आहेर यांना दिला सल्ला!

संगमनेर दि.२४( जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्याला चांगल्या फलंदाजाची  गरज आहे,समोरून कसाही बाॅल आला तरी टोलावता आला पाहीजे.फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा आशी शाब्दीक फटकेबाजी करीत महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनार्दन आहेर यांना आता एकच संघ निश्चित करण्याचा सल्लाही दिला.

निमित होते घारगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे.हिंदह्दय स्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन एकवीस वर्षापासून करण्यात येते.यंदाही या स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

मात्र स्पर्धेचे औचित्य पाहून विखे पाटील यांनी क्रिकेटच्या भाषेतच राजकीय फलंदाजी करून केलेले सूचक वक्तव्याला उपस्थितांनी दाद दिली.

या स्पर्धेतून चांगले फलंदाज गोलंदाज मिळाले आहेत.तसेही या तालुक्याला चांगल्या फलंदाजांची आवश्यकता आहे.समोरून कितीही आणि कसेही बाॅल आले तरी टोलावता आले पाहीजे फिल्डीगचे काम माझ्यावर सोडा असे सांगतानाच जनार्दन आहेर यांना सल्ला देताना आता एकच कोणता तरी संघ निश्चित करा आयपीएल सारखे संघ बदलू नका.आपले भविष्य घडविण्यासाठी निर्णय करण्याची वेळ आली असल्याचा मित्रत्वाचा सल्ला देवून एकप्रकारे भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रणच दिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!