दाढ (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान व समस्त दाढ बुद्रुक ग्रामस्थ आयोजित श्री साई सच्चरित पारायण व भव्य संगीतमय श्री शिवमहापुराण कथा सोहळा दिनांक २५ डिसेंबर ते ०१जानेवारी होणार आहे.
त्यात ह. भ. प. अंजली दीदी (आळंदीकर) यांच्या सुमधुर वाणीने श्री शिवमहापुराण कथा व ह. भ. प. श्री उध्दव महाराज मंडलिक यांचे काल्याचे किर्तन होणार आहे १६ वर्षापुर्वी स्व. डॉ.अशोकराव तांबे पाटील यांनी गावातील तरुण ३१ डिसेंबर हॉटेलवर जाऊन सेलिब्रेशन न करता धार्मिक कार्याने करावा व नवीन पिढीला आध्यात्माची आवड निर्माण व्हावी म्हनुन तरुणांना सोबत घेऊन हा उपक्रम सुरू केला त्यांच्यानंतर श्री योगेश तांबे पाटील व त्यांच्या मित्रमंडळाने हा उपक्रम पुढे सुरू ठेवला.
यापुढे श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान स्थापन करून गावातील सर्व युवकांना सोबत घेऊन अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून दाढ बु गावातील लोकांसाठी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवले आहे , कार्यक्रमाची सुरुवात २५डिसेंबर रोजी सकाळी ७.००वाजता साई सच्चरित पारायणाने श्री साईभक्त श्री सोपान मांढरे गुरुजी यांच्या उपस्थितीत सुरू होणार असून संध्याकाळी ७ ते९ या वेळेत ह. भ. प. अंजलीदिदि आळंदी कर यांच्या सुमधुर वाणीने भव्य संगीतमय श्री शिवमहापुराण कथेची सुरुवात व तदनंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.