नगर( जनता आवाज वृत्तसेवा ):- सालाबादप्रमाणे यावर्षीही दातरंगे मळा येथील दत्त कॉलनीत श्री दत्त जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यंदा रक्तदान शिबीरात श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगबंर युवा विकास प्रतिष्ठानच्या 102 युवकांनी उत्सर्फुतपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबीरात दातरंगे मळा परिसरातील नागरीकांसह नगर शहर परिसरातील युवकांनी सहभाग घेतला.
यावेळी आनंदऋषीजी रक्त पेढीचे सुनील महानुर म्हणाले कि, रक्तदान केल्याने आपण कोणाला तरी जीवनदान देतो, याचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकांने वर्षातुन किमान एकदा तरी करावे. रक्त हे कोणत्या फॅक्ट्रीत तयार होत नाही. गरज भासल्यास कोणी तरी रक्तदान करावेच लागते, या उद्देशानेच प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २० वर्षापासून रक्तदान शिबीर भरविण्यात येत आहे. रक्तदान करून आपण राष्ट्र सेवा करत आहात अशीच जनसेवा आपणा कडून नेहमी होत राहो तसेच दत्त जयंती उत्सव वर्ष २१ साठी शुभेच्छा दिल्या.
धार्मिक कार्यक्रमाबरोबरच प्रतिष्ठान सामाजिक कार्यक्रमही घेतले आहेत. यंदा रक्तदान शिबीरात श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या 102 युवकांनी उर्त्फुतपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबीरात दातरंगे मळा परिसरातील नागरीकांसह नगर शहर परिसरातील युवकांनी सहभाग घेतला. यावेळी 150 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. या शिबीराला आनंदऋषीजी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्तविकात दिपक गुंडू व श्रीनिवास इप्पलपल्ली म्हणाले कि, दत्त जयंतीनिमित्तने प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी रक्तदान शिबीर भविण्यात येतो आणि या शिबीरात युवक व महिला मोठ्या संख्येने रक्तदान करतात. रक्ताचा तुटवडा असल्यामुळेे दरवर्षी प्रतिष्ठानच्यावतीने या शिबीराचे आयोजन केले जाते. तसेच प्रतिष्ठानच्यावतीने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. दत्त जयंती निमित्त यावर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, तसेच मनोरंजन कार्यक्रम कार्यक्रम घेण्यात येत आहे. रक्तदान शिबीरात 102 युवकांनी रक्तदान करुन सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. दत्त जयंतीच्या औचित्याने सामाजिक कार्यात मदतीचा हात मिळावा, या उद्देशानेच विविध शिबीरे घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दि.26 डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे, त्याच दिवशी सामुदायिक विवाह संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त दत्त भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत सब्बन यांनी केली आहे.
या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी व निलाबंरी महिला मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश ताटी व दिपक गुंडू यांनी केले. तर आभार विराज अजय म्याना यांनी मानले.