17 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

मांजा मुळे गळा चिरल्याने मुलगा थोडक्यात बचावला

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता शहरात गल्ली मध्ये खेळत असताना पतंगी चा मांज्या मुळे गळ्याला जखम झाली यामध्ये दहा वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला आहे दैव बलवत्तर म्हणून मुलाचे प्राण वाचले आहे संक्रातीच्या काळात नायलान मांजा विक्रीवर बंदी असताना राहाता शहरात सर्रास नायलान मांजा विक्री सुरू आहे.

मात्र नगरपालिका प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.त्यामुळे रोड वरून ये जा करणारे नागरिक यांना इजा होतो त्यामध्ये काहींचे जीवही गेल्याचे समोर आलेले आहे परंतु याबाबत प्रशासन किती गाफील आहे याचे उत्तम उदाहरण आज शहरात बघायला मिळाले शासनाने नायलान मांजा वर बंदी घातलेली असताना कुणाच्या आशीर्वादाने दुकानदार नायलान मांजा विक्री करतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहे यापूर्वी नायलान मांज्यामुळे अनेक नागरिकांना इजा झाल्याची घटना समोर आली आहे.

जर यामुळे कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?तरी याबाबत आता नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करत नायलान मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

पुढील काही दिवस या मांज्या मुळे कुठलीही इजा होऊ नये म्हणून नागरिकांनी संरक्षण म्हणून आपला चेहऱ्यापासून गळ्यापर्यंत स्कारप वापरावे-

डॉ.संतोष मोकळं(एम.एस.सर्जन)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!