श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्रीगोंदा शहरामध्ये मेन पेठेलगत श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. सदरील मंदिराची नोंद राज्य पुरातत्व खात्याकडे आहे. तसेच सदरील मंदिरास पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. याठिकाणी असंख्य भाविक दर्शनासाठी भेट देत असतात. सध्या या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता अस्तित्वात नाही.
यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत असून त्यांची अवहेलना होत आहे. तसेच मंदिराकडे समोरून येणारा रस्ता बंद झाल्यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे. सध्या मार्गशीर्ष महिना प्रारंभ झालेला असून यानिमित्ताने भाविकांची संख्या वाढत आहे. परंतु रस्ता नसल्यामुळे त्यांना मंदिराकडे पोहचता येत नाही. तरी प्रशासनास सदरील प्रकरणी आपण लक्ष घालून पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले पुरातन श्री महालक्ष्मी देवीचे मंदिराकडे समोरच्या बाजूने येणारा व इतर बाजूने येणारे रस्ते त्वरित खुले करून मिळावेत अन्यथा मंगळवार दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर याठिकाणी आमरण उपोषणास बसत असून होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अशा आशयाचे पत्र वरिल कार्यालयास पाठविले असुन यासंदर्भात पुरातत्व विभाग नाशिक यांचे पत्र नगरपालिकेस प्राप्त झाले अाहे. परंतु तहसिलदार साहेब व मुख्याधिकारी साहेब यांनी कोणतीही हालचाल आमच्या विषया संदर्भात केलेली दिसुन येत नसल्याने आम्ही उद्या सकाळी श्री महालक्ष्मी देवी मंदिरामध्ये आमरण उपोषणास बसत आहोत.
श्री. दतात्रय गेणबा जगताप
( सामाजिक कार्यकर्ते, श्रीगोंदा )