राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होईल आणि निळवंडे मधून राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल हे दोनही सण नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करावेत मात्र हे सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की राहुरी तालुक्यातील कनगर या ठिकाणी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील नागरिकांना साखर व हरभरा डाळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश दादा बानकर, संदीप गिते, विजय कानडे, दिपक वाबळे अमोल भनगडे,दादा पाटील हारदे, मयूर हारदे विजय बलमे,सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच बाळासाहेब गाढे,बाबासाहेब गाढे, संदीप घाडगे महमद भाई इनामदार, दत्तू गाढे, सोसायटी चेअरमन दत्तात्रय गाढे, भगवान घाडगे, सुभाष नालकर, भाऊसाहेब घाडगे , राजेद्र दिवे शंकर राव जाधव, यशवंतराव जाधव, तुषार गाढे, दादासाहेब घाडगे, सुनील शेटे, गोविंदराव दिवे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी सांगितले की शिंदे व फडणवीस सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामे होत आहेत दीड वर्षांमध्ये जी विकास कामे केली गेली ती विकास कामे तीन वर्षे सत्ता असून देखील विरोधी पक्षाने केली नाहीत साखर व हरभरा डाळ वाटणे ही शासनाची योजना नाही येत्या 22 तारखेला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होत आहे सर्वांसाठी हा मोठा सण आहे या निमित्ताने साखर व डाळीच्या माध्यमातून प्रत्येक घराणे लाडू बनवून श्री रामांना वाहून त्यांची पूजा करावी त्यांना हा नैवेद्य दाखवावा आणि हा आनंद उत्सव दिवाळी सारखा साजरा करावा हा शुद्ध उद्देश घेऊन आम्ही सर्वत्र हा उपक्रम राबवत आहोत त्याचे कोणी राजकारण करू नये निळवंडे संदर्भ मध्ये अनेक राजकारण केले गेले विखे घराणे निळवंडे चे पाणी येऊन देणार नाही अशी वल्गना नेहमी विरोधकांनी केली मात्र आम्ही सर्व सामान्य नागरिकांच्या बरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत सदैव आणि यासाठी आमच्या शासनाने सर्वाधिक निधी मंजूर केला आणि विखे घराण्याचे पालकमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निळवंडे ला पाणी सोडण्यात आले आता येत्या 22 तारखेला निळवंडे च्या कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहुरी तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणी सोडतील तो अधिकार त्यांचा आहे कनगरच्या वर्ग दोनच्या जमिनीचा प्रश्न देखील अगदी कमी कालावधीमध्ये मार्गी लावला जाईल सत्तेचा वापर जनकल्याणासाठी करणारी विखे घराने जे काम हातात घेते ते पूर्णत्वास नेते त्याची कुणी काळजी करू नये.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामे केली जात आहेत आम्ही नेहमी विकासासाठी अग्रेसर राहणारे आहोत महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे नामदार झाले त्यांचे काम शून्य असल्याने नागरिकांना आज देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे विद्युत खाते असताना देखील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज नदेऊ शकणाऱ्यांनी इतरांवर आरोप करणे थांबवावे निधी पालकमंत्री व खासदार आणतात आणि श्रेय घेण्यासाठी त्याचे भूमिपूजन विद्यमान आमदार करतात हे कुठपर्यंत योग्य आहे मात्र येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल 50 वर्ष रखडलेला निळवंडे चा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे येत्या काही दिवसांमध्ये कनगरच्या गावा संदर्भातील वन खात्याचा प्रश्न देखील पालकमंत्री मार्गी लावणार आहेत त्याचबरोबर प्रत्येकाच्या शेताला पाणी देखील मिळणार आहे निळवंडे च्या माध्यमातून परिसरातील तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून मिळतील याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे निळवंडे बाबत आमचे योगदान नाही असे म्हणणाऱ्यांनी आम्ही निळवंडे साठी काय काय केले हे तपासले पाहिजे तुम्ही घरी बसून बाता मारता मात्र आम्ही प्रत्यक्षात नागरिकांसाठी काम करतो तुमचे 50 वर्षांमध्ये निळवंडे साठी योगदान काय असा प्रश्न देखील त्यांनी विरोधकांना उपस्थित केला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सरपंच सर्जेराव घाडगे यांनी मानले.