नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- १५१ वर्षांची परंपरा असलेली जळगाव येथुन निघुन श्री क्षेत्र नेवासा येथून जाणारी श्रीराम मंदिर संस्थान जळगाव संचलीत श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा पंढरपूर आषाढी वारी साठी पालखी सोमवार दि ३ जुन रोजी जळगाव येथील श्रीराम मंदिर येथुन प्रस्तान करुन अप्पा महाराज समाधी मंदिर येथुन पाचोरा वेरुळ तुर्काबाद खराडी अमळनेर प्रवरासंगम मार्गे श्री क्षेत्र नेवासा येथे आली असता फटाक्याच्या आतषबाजीत श्री खोलेश्वर गणपती चौकात रासने परिवाराच्या वतीने वसंत रासने , योगेश रासने, राजेंद्र रासने, मयूर रासने यांनी पालखीचे पूजन करून स्वागत केले .
यानंतर नगरपंचायत डॉ हेडगेवार चौक , मारुती चौक , मार्गे मोहिनीराज मंदिर प्रांगणात आली असता सेवा निवृत्त कोषागार अधिकारी दत्तात्रय जोशी सेवा निवृत्त नायब तहसिलदार प्रदिप पाठक भालचंद्र बडवे, मुकुंद शिंदे ,निखिल जोशी, ऋषिकेश जोशी बबन महाराज उपाध्ये ,ओमकार जोशी संतोष कुंढारे, मकरंद देशपाांडे अनिल बडवे पराग बडवे श्रीपाद बडवे संतोष चांदणे , सतिष उपाध्ये यांनी पालखीचे दर्शन घेऊन ह.भ.प मंगेश महाराज यांचा सन्मान केला. व दिंडीतील भाविकांनी श्री मोहिनीराजाचे दर्शन घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आले असता गोरख भराट यांनी स्वागत केले .
पालकी सोहळा मुक्कामी असलेल्या भाविकांना सुरेशराव देशमुख यांच्या वतीने पंगत देण्यात आली . पहाटे ६ वाजता संत ज्ञानेश्वर मंदिरातून दिंडीने प्रस्तान केले .
दिंडीचा येण्याचा मार्ग वेगळा व जाण्याचा मार्ग वेगळा असल्याने दोन्ही मार्गात जेथे जेथे दिंडी मुक्कामाला राहणार आहे, अशा सर्व गावांत व्यवस्थेसाठी आधी पत्रिकांचे पुजन करुन रवाना करण्यात येतात.
मुक्ताई दिंडीच्या प्रस्थाना झाली.