18 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

खेळांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो – डॉ.महावीरसिंग चव्हाण  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा

लोणी दि.२८( जनता आवाज वृत्तसेवा ):-खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, निर्णय क्षमता, सहानभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो असे प्रतिपादन म.फु.कृ.वि. राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीरसिंग चौहान यांनी केले. लोकनेते डॉ. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या प्रसंगी बोलत होते.

डॉ.शुभांगी साळोखे यांनी आपल्या प्रास्तविकाच्या भाषणामध्ये कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या स्पर्धत २६ महाविद्यालयातील ३६० पेक्षा जास्त खेळाडू या क्रिडाप्रकारात सहभागी झाले, ही नक्कीच प्रवरेसाठी कौतुकास्पद बाब आहे. खेळाडूंनी आपले मनोबल वाढवले पाहिजे, यश अपयशाने खचून न जायचे नसते तसेच खेळ हा खेळाडूवृत्तीनेच व्हायला हवा असे सांगत त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

सह  सचिव भारत घोगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शब्दांमधून प्रेरीत करत खिलाडूवृत्तीने खेळण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रस महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीरसिंग चव्हाण, संस्थेचे सहसचिव श्री.भारत घोगरे पाटील, कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी, डॉ.अनिल बेंद्रे, प्रवरा मेडिकल कॉलेज चे क्रिडा अधिकारी प्रा. एस. एस. बुलार, महाविद्यालयाचे क्रिडा प्रशिक्षक प्रा.सिताराम वरखड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तन्मय शिंपी आणि कु. अदिती कोरडे यांनी केले, खेळाडूंना शपथ कु. प्रसाद नलवडे यांनी दिली तर आभार महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. सिताराम वरखड यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!