आंबी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अस्मिता रुरल फाउंडेशन संचलित स्व. विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश मीडियम स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कार व सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रारंभी सरस्वती प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
यावेळी डॉ.भागवत वीर, डॉ.खुरुद, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज, राहुरी निधीचे चेअरमन रामभाऊ काळे, अशोक कर्डिले, विष्णुपंत लाटे, रावसाहेब लाटे, संजय मुसमाडे, शरद बेहळे, रजनी कर्डिले, मीरा पठारे, संस्थेचे संस्थापक भागवत पठारे, संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर पठारे, मुख्याध्यापिका पल्लवी पठारे आदिंसह मान्यवर व पालक उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशा नृत्याने करण्यात आली. यावेळी राम राज्य, विठू नामाचा गजर, छत्रपती शिवरायांचा पोवाडा, बाईपन देवा आदींसह फ्युजन, सोलो नृत्य सादर केले. तर सोशल मीडियाचा गैरवापर व स्त्री भ्रूण हत्यापर नाटिका सादर करून सामाजिक बांधीलकी जोपासली.स्त्रीभ्रूण हत्या नाटिकेत शिक्षिकांनी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.सूत्रसंचालन मुख्याध्यापिका पल्लवी पठारे यांनी केले तर आभार संचालक ज्ञानेश्वर पठारे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रद्धा निद्रे, अंजली बेहळे, सोनाली पुंडकर, पूजा वंजारी, कविता पांडे,वैशाली वाळके,संदीप चव्हाण, अकबर शेख दत्तात्रय पठारे, बाळासाहेब गायकवाड, सुनील हिंगणे, भास्कर भालसिंग, वंदना सरोदे आदींनी परिश्रम घेतले.