मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- आज ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मागील एक वर्ष प्रतीक्षा केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी केला. आज शिबिरात असलेले अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावाही कायंदे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली.
उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद आ. मनीषा कायंदे यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेना ठाकरे गटाचे आज वरळीत शिबीर पार पडले. मात्र, त्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे ह्या नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्या शिंदे गटात प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश केला. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी म्हटले की, माझ्यासाठी आज खूप सन्मानाचा दिवस आहे. जी मूळ शिवसेना आहे यांच्यामध्ये आज मी पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले. मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. हा बदल का झाला आत्ताच का झाला? हा सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. हा एक वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय काम केले हे जनता पाहत आहे. मूळची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आहे त्यामुळे मी इथे आले आहे. आ. मनीषा कायंदे म्हणल्या आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मै कुछ नही करुंगा.. किसी को कुछ नही करने दूंगा.