लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोणीत सुरु असलेली स्वयंसिध्दा याञा ही नवं उद्योजकांना मोठी पर्वणी ठरत आहे.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी च्या संकल्पनेतून महिला सक्षमिकरण,भरड धान्य आणि तृणधान्य अभियान,शेतक-यांचे उत्यादन दुप्पट करण्यासाठी शेतमालावर प्रक्रिया,टाकाऊ पासून टिकाऊ यासह सेंद्रीय शेती पुरुषप्रधान संस्कृतीत ही हम भी कम नही हाच संदेश लोणीच्या स्वयंसिद्धा यात्रा २०२३ च्या माध्यमातून महीलांनी स्वता: सक्षम होत आपल्या व्यवसायातून समजून मार्केटींज तंञ समजून घेत लाखो रुपयांची उलाढाल या स्वयंसिद्धा यात्रेतून करत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची मेक इन इंडीया संकल्पना प्रत्यक्ष कृती उतरविली आहे.
महीला म्हणजे चुल आणि मुलं पण बचत गटातून महीला काय करू शकते हेच तिने दाखवून दिले आहे स्वयंसिद्धा यात्रा २०२३ च्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील खा. डॉ. सुजय विखे पाटील, रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली लोणीत म्हसोबा महाराज याञेनिमित्त जनसेवा फौंडेशन लोणी, पंचायत समिती राहाता, कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर,पशुसंवर्धन विभाग आणि कृषि विभाग आत्मा अहमदनगर यांच्यावतीने आयोजित राहाता तालुकास्तरीय महीला महोत्सव मंगळवार पासून सुरू आहे. जिल्हातील महीला बचत गटाबरोबरचं शेती,आयुर्वेद,आरोग्य आणि शासकिय योजनांचा जागरचं ही स्वयंसिध्दा याञा ठरत आहे.
यावर्षी जवळपास १२० गटांनी सहभाग घेत. नाविन्यपूर्ण कलाकृती, विविध शोभेच्या वस्तु, टाकाऊ पासून टिकाऊ अशा वस्तुसह विविध मसाले, हळद प्रक्रिया उद्योग, हळदीपासून कुंकू उत्पादन, हळद दुध मसाला याद्वारे उत्पादन प्रक्रिया आणि विक्री ही स्थानिक पातळीवर सुरु केली आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि महाविद्यालय लोणीच्या विद्यार्थ्यांची नर्सरी, दुग्धजन्य पदार्थ,गृहविज्ञान आणि संगणक महाविद्यालयाच्या वतीने टाकाऊ पासून टिकाऊ विविध कलाकृती, कृषि विभागाच्या वतीने विविध योजना,फळबाग,भाजीपाला,फुलशेती,जिरायत शेती तंञज्ञान,तृणधान्य तंञज्ञान, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध योजना, चारा पिके,मुक्त संचार गोठा,लसीकरणआदीची माहीती दिली जाते.
कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वरच्या माध्यमातून जैविक खते,जैविक औषधे यासह सेंद्रीय शेतीची माहीती, पायरेन्सच्या डाॅ.विखे पाटील आयुर्वेदिक हाॅस्पिटलव्दारे आयुर्वेदांची जागृती, महीलांचे बचत गट स्थापना करतांनाच महीलांना मुख्य प्रवाहात आण्यासाठी जनसेवा फौडेशने फुलांपासून तयार केलेली अगरबत्ती, अष्टगंध, धुप विविध प्रकारचे सेन्ट, रूमफेशनर याशिवाय आरोग्यदायी असा सॅनेटरी नॅपकीन ही या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला आहे.
शासनांच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून महीलांची आरोग्य विषयी जनजागृती बरोबरचं एच.बी.,बी.पी.शुगरसह आयुष्यमान भारत कार्डसह विविध योजना,साथीचे आजार याविषयी माहीती दिली जात आहे.उसांच्या रसापासून राहुरी येथीलविजय वाघ यांनी सेद्रिंय गुळ,जिलेबी असे विविध पदार्थ ठेवले आहेत.
खाद्य महोत्सवामध्ये विविध प्रकारचे पराठे, कर्जतची शिंपी आमटी, डांगर घारी, बेकरी पदार्थ, विविध प्रकारचे भजे आळू कोथंबिर ,पालक वडी, मासवडी असे एक ना अनेक पदार्थ येथे महीलांनी विक्रीसाठी ठेवले असून ग्राहक देखिल सह कुंटूब मनसोक्त ताव या खाद्य पदार्थावर मारत आहे.
मी माझा व्यवसाय २००८ पासून सुरु केला.२०१३ पासून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी स्वयंसिध्दा याञेतून आम्हाला व्यासपीठ दिले याव्दारे मार्केटींग,प्रशिक्षण,संवादकौशल्य मिळाल्याने माझ्या मसाले उद्योगाला मोठे पाठबळ मिळाले.
– प्रतिभा घोगरे