24.2 C
New York
Wednesday, August 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

वेल्हा तालुक्यातील राजगडच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह सापडला, सदरची तरुणी ही एमपीएससी पास असून आठ दिवसापासून बेपत्ता होती.

वेल्हा (जनता आवाज वृत्तसेवा):- पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक तरुण युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने तिची ओळख पटवणे अवघड जात आहे. पोलिसांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.

दर्शना दत्तू पवार असे मृत तरुणीचे नाव आहे. ती नुकतीच एमपीएससीची (MPSC) परीक्षा परीक्षा पास झाली होती. तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली होती. 15 जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये ही तरुणी हरवली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळून आल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह आढळून आला.
 दर्शना रविवारी ९  रोजी पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमासाठी  स्पॉट लाईट अकॅडमी येथे आली होती. दि. ११ रोजी दर्शना घरच्यांच्या संपर्कात सायंकाळ 4:00 वाजेपर्यंत ती संपर्कात होती. दि.१२ रोजी तिला घरचे फोन लावत होते. परंतु ती फोन उचलत नव्हती. त्यानंतर तिच्या घरच्यांनी स्पॉट लाईट अकॅडमी मध्ये चौकशी केल्या असता. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, दर्शना ही तिच्या मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्याबरोबर राजगड व सिंहगड येथे फिरण्यासाठी गेले आहे. त्यानंतर ते दोघेही संपर्कात नाही आणि माघारी ही आली नाही. म्हणून त्यांच्या घरच्यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दिली.
 वेल्हा तालुक्यातील राजगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ या परिसरात एका  मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे अशी माहिती मिळाली. साधारण हा खून आठ दिवसांपूर्वी झालेला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. मृतदेहाच्या जवळ सापडलेल्या वस्तू वरून या तरुणीची ओळख पटले ची माहिती समोर आली.
 सदरची ही तरुणी एमपीएससीची परीक्षा देत होती. की त्यात पासही झाली होती. परंतु आठ दिवसांपूर्वी या तरुणीचा खून कशामुळे झाला याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!