पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):- रस्ते सुरक्षा हि आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.सुरक्षित प्रवास होण्याचे गरजे बद्दल सर्व चालकांनी जागरूक असलेले पाहिजे असे प्रतिपादन सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकुर यांनी केले.ते पारनेर आगार येथे सुरक्षितता अभियान कार्यक्रम प्रसंगी वाहन, चालक यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
रस्ते वाहतुकीत सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित वाहतूक सेवा देणारे महामंडळ आहे. राज्य परिवहनचे अपघात टाळण्यासाठी महामंडळा कडून नियमित पने अपघात नियंत्रण उपाय योजना करण्यात येत आहेत.दरवर्षी जानेवारी महिन्यात अपघात सुरक्षितता अभियान राबविण्यात येते. या अभियानातंर्गत राज्य परिवहन महामंडळातील पारनेर आगाराचे चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे प्रबोधन करण्यासाठी ११ जानेवारी ते २५ जानेवारी या पंधरवड्यात सुरक्षितता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे .या अभियानाचे कार्यक्रम अध्यक्षस्थानी पारनेर आगाराचे व्यवस्थापक योगेश लिंगायत होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक अ.म.कोतकर, वाहतूक निरिक्षक ज ज क्षेत्रे, लेखाकर चि.बा तारडे, वरिष्ठ लिपिक सां.प्र.लोंढे, लिपिक सु.बा.औटी, रा.वि.रायकवर, नवनाथ ढाकणे, लिपिका नंदा मुत्याल, रा.म.ससाणे, दि.ढ.नवले, वाहक सुभाष शिंदे, न म . ब.शिंदे, व्हि एम् पोटे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विना अपघात वाहन चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वाहन चालक व यांत्रिक कर्मचारी याना मार्गदर्शन करतांना विजय ठाकूर म्हणाले की, रस्ते सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हा रस्ता विषयी जागरूक राहणे हि समाजातील सर्वांची जबाबदारी आहे. वाहन चालकाने वाहन चालवताना विना अपघात सुरक्षित वाहन चालविले पाहिजे. वाहन चालवताना धूम्रपान करू नये. वाहन अतिवेगाने चालवू नये, गाडी रिव्हर्स घेताना काळजी पूर्वक मागे घेतली पाहिजे, चुकीचे पद्धतीने पुढील वाहनाला ओलांडून जाऊ नये, रस्त्यात अचानक गाडी थांबवु नये, पुढील वाहन आणि आपले वाहन यात आवश्यक अंतर असले पाहिजे, घाट चढताना व उतरताना लो गिअर चा वापर न करणे, दिवे बंद न करणे, योग्य ती सावधगिरी न बाळगता जंक्शन पार करणे, योग्य ती सावधगिरी न बाळगता विना पहारेकरी रेल्वे फाटक पार करणे, योग्य सावधगिरी न बाळगता नदी, नाले ओढे पुल पार करणे, दारूचे अमलात वाहन चालविणे, वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी अतिवेगाने वाहन चालविणे, वाहन चालवताना भ्रमण ध्वनीचा वापर करणे, लेंनची शिस्त न पाळणे, मार्गावरील निर्धारित वेगमर्यदा न पाळणे या सर्व गोष्टींची वाहन चालकांनी लक्षपूर्वक काळजी घेणे अव्याशक आहे. यावेळीआगार व्यवस्थापक योगेश लिंगायत, वाहतूक निरिक्षक ज. ज. क्षेत्रे, यांनी कर्मचाऱ्यांना विना अपघात सुरक्षेसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश औटी यांनी केले तर आभार अमोल कोतकर यांनी मानले.