लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-सध्या बाजारात विक्री साठी उपलब्ध असलेल्या चिनी नॉयलॉन मांजामुळे वन्य जीवांसह मनुष्य धोक्यात आला आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी नॉयलॉन मांजावर बंदी असूनही अनेक ठिकाणी दुकानदारांकडून नॉयलॉन मांजाची विक्री केली जाते.
नॉयलॉन मांजाची विक्री होवू नये म्हणून वन्य जीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी लोणी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री आशिष चौधरी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
नॉयलॉन मांजामुळे वन्य पशू पक्षी प्राणी यांच्यासह सायकल स्वार, मोटार सायकल चालक यांच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अनेक शहरात नॉयलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या सणाच्या काळात अडकलेल्या पतंगाच्या मांजामुळे अनेक वन्य पशू पक्षी प्राणी अडकून दगावतात, दुखापत ग्रस्थ होतात. त्याचा परिणाम वन्य पशू पक्षी प्राणी यांची संख्या घटत असुन त्याचा परिणाम निसर्गावर होवून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. अनेकदा याचा फटका सायकल स्वार, मोटार सायकल चालकांना बसलेला आहे. त्यामध्ये त्यांचा गळा चिरून जायबंदी झालेले आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी लोणी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लोणी गाव व प्रवरा परीसरात नॉयलॉन मांजा विक्रीवर बंदी आणून कडक नियमावली करून कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली आहे. यावेळी लोणी बुद्रुक ग्रा. प. सदस्य प्रविण विखे, वृक्षप्रेमी दिलीप धावणे,लोणी खुर्द सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. सुनिल आहेर, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सुनिल विखे,गोगलगावचे सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद मगर, कृष्णा धावणे, प्रकाश दिघे, संदीप विखे, निलेश कराळे, दत्ता मुसळे, विजय बनसोडे,हजर होते.
आपले सण उत्सव साजरे करत असताना आपल्या पतंगाच्या मांजामुळेकुठल्याही जीवाला धोका होणार नाही याची काळजी पतंग उडवणाऱ्यांनी घ्यावी. सणाचा आनंद घेताना दुसऱ्याचाही विचार करावा. प्राणी वाचवा निसर्ग वाचवा
(वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के)