छत्रपती संभाजी नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):- खुलताबाद येथील पुरातत्व औरंगजेब कबरीस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी भेट दिली.
प्रकाश आंबेडकरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केला – भाजप नेते अजित चव्हाण
यावरून महाराष्ट्राचे राजकारणामध्ये अनेक संघटना आणि संताप व्यक्त केला आहे. यावरूनच भाजप नेते अजित चव्हाण यांनी याच मुद्यावरून टीकास्त्र सोडले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पापी औरंगजेबाच्या कबरी वरती जाऊन त्याला सलाम ठोकला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा अपमान असून केवळ हिंदूच नाहीतर खोजा, शिया, अहमदिया, बौद्ध, जैन सर्वधर्म्यांच्या विरोधात असलेल्या औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाचं वाचन प्रकाश आंबेडकरांनी केलं तर मूलतत्त्ववाद्यांना पाठिंबा देणं किती धोक्याचा आहे याची प्रचिती त्यांना येईल केवळ मत मिळवण्यासाठी आपला वारसा विसरून अशा प्रकार करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केला आहे असं चव्हाण यांनी म्हटले आहे.