लोणी दि.१८( जनता आवाज
वृत्तसेवा ):-विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात विकास व्हावा या हेतूने लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी सुसंवाद व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात नोकरी साठी उपलब्ध असलेल्या संधीबद्दल माहीती व्हावी या हेतूने बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नुकत्याच निवड झालेल्या माजी विद्यार्थीनी कु.स्वामीनी नवले यांना आमंत्रित करण्यात आले होते. कु. नवले यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल माहिती करून देत आपल्या बँकिग च्या करिअर बद्दल असलेली अनुभवांची शिदोरी उलगडली.
याप्रसंगी कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ. विशाल केदारी, प्रा. मिनल शेळके, डॉ. सरिता साबळे, प्रा. स्वरांजली गाढे, प्रा.सारीका पुलाटे, प्रा. मनीषा आदिक, डॉ प्रा. भाऊसाहेब घोरपडे, डॉ. स्वप्नील नलगे, प्रा. प्रवीण गायकर, प्रा. महेश चंद्रे, डॉ. अमित अडसुल, प्रा.चंदन दिपके आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक भाऊसाहेब घोरपडे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी समन्वयक व सहाय्यक प्राध्यापिका सारीका पुलाटे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थीनी कु. अदिती कोरडे यांनी केले.