लोणी दि.१४( जनता आवाज वृत्तसेवा):- शिक्षणांसोबत आपली संस्कृती जपण्याचे काम प्रवरेच्या शैक्षणिक संकुल करत आहे.ओळख गड किल्याची आणि सफर किल्लाची यांतून प्रबोधन केल्याने प्रवरा कन्यांनी मेहनतीने स्व हाताने बनवलेले असंख्य गडकिल्ले मान्यवर व पालकांचे आकर्षण ठरले..
प्रवरा कन्या प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय लोणीचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे मा.डॉ.अक्षदा आघाव ( इलग ) राज्य विक्रीकर निरीक्षक व माजी विद्यार्थीनी , तर अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील होत्या- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे , सहसचिव भारत पा घोगरे , शिक्षण समन्वयक प्रा. नंदू दळे, संस्थेचे संचालक लक्ष्मणराव चिंधे , ट्रक सोसायटी चेअरमन नंदूशेठ राठी , लोणी बु.च्या सरपंच मनीषाताईं मैड , स्थानिक कमेटीचे सुनील आहेर , लोणीच्या माजी सरपंच सौ मनीषा आहेर प्राचार्या भारती देशमुख, प्रवरा कन्या इंग्लिश मेडीयम प्राचार्या सौ. रेखा रत्नपारखी, प्रवरा कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ भारती कुमकर, पर्यवेक्षक श्री बी पी चिंधे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ सीमा बढे , कानिष्ठ महाविद्यालय इनचार्ज प्रा नंदू कुदळे, ज्येष्ठ शिक्षक प्रा.अनिल लोखंडे ‘ , प्रा गिरीश सोनार , सौ मोहिनी गायके ,विद्या घोरपडे यांसह अनेक मान्यवर व स्थानिक पालक आणि २६ जिल्ह्यातील आलेले अनेक पालक उपस्थित होते.
यावेळी डॉ अक्षदा आघाव यांनी आपणास शालेय जीवनात मिळालेले नीतिमूल्याचे ,शिस्तीचे धडे, योगसाधना ,संयम व शिक्षकांनी दिलेले शैक्षणिक ज्ञान हे स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत असते असे आवर्जून सांगितले. तर सौ शालिनीताई विखे पाटील यांनी प्रवरा पॅटर्न राज्यासह देशभरात विविध स्तरावरील अधिकारी तयार करून आपला नवलौकिक या विद्यार्थीनीच्या माध्यमातून दुरवर पसरवण्याचे काम करीत आहे ही संस्थेच्या दृष्टीने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पडलेल्या शैक्षणिक व समाजिक गोड स्वप्नांची फलप्राप्ती आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून त्यांचे स्वप्न पुढे घेऊन जाण्याचे आपण सर्वजण त्या कामाला आकार देण्याचे व पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
मुलींनी विविध क्षेत्रातील केलेली कामगिरी व मिळवलेले नेत्रदीपक पारितोषके निश्चितच शाळेच्या व संस्थेच्या दृष्टीने गौरवास्पद व अभिमानास्पद बाब आहे. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून सर्व मुलींचे व विद्यालयाच्या प्राचार्या व स्टाफचे अभिनंदन केले. नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले संवर्धन व यशोगाथेवर आधारित छान संस्कृतिक कार्यक्रम नाटिका,नृत्य, मिमिक्री च्या माध्यमातून सादर केला. हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सुरेश गोडगे, अनिल लोखंडे,आर एम लबडे, सौ मोहिनी गायके , सौ कल्पना कडू, सोनाली मेढे, सोनाली पवार , सुवर्णा तांबे, अर्चना रोकडे, स्वाती अंत्रे, रवींद्र डगळे ,जितेंद्र बोरा,योगेश दिघे ,नितीन शिरसाठ, विकास मांढरे, सूरज फणसे, सागर मोघे,मयूर थेटे, सागर शेजूळ, अनिल बोंबले, प्रशांत भावसार आदिनी विशेष परिश्रम घेतले.सर्व पालकांनी आपल्या मुलींनी विविध कला, संस्कृतिक, क्रीडा ,विज्ञान ,वक्तृत्व ,निबंध स्पर्धेत घवघवीत मिळवलेल्या जिल्हा ,विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल कौतुक व अभिनंदन केले.