संगमनेर दि.१५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.प्रवरा डावा कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्यातून सोमवार पासून आवर्तन सोडण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.
महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली संगमनेर येथील उपविभागीय कार्यालयात जलसंपदा विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सपंन्न झाली.या बैठकीत मुळा गोदावरी आणि प्रवरा धरण समूहाच्या आवर्तनाचा आढावा घेण्यात आला.
निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी अधिकार्याकडून माहीती जाणून घेतली.सर्व तांत्रिक काम पूर्ण झाली असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
राम मंदीर उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विखे पाटील म्हणाले.राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यत पाणी पोहचेल यासाठी दिड टिएमसी पाण्याचा वापर करण्यात येईल.
प्रवरा धरण समूहातील उपलब्ध पाण्याचा साठा लक्षात घेवून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोमवार पासून आवर्तन सोडण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.लाभक्षेत्राातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्याची कार्यवाही सोमवारपासून करण्याबाबतही विखे पाटील यांनी अधिकार्याना दिल्या.पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री विखे यांनी दिले.
गोदावरी लाभक्षेत्राचे आवर्तन आताच चांगल्या पध्दतीने झाले.सुयोग्य नियोजन झाल्याबद्दल त्यांनी अधिकार्यांचे अभिनंदन केले.
या बैठकीस नासिक जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे अधिक्षक अभियंता महेंद्र आमले प्रांताधिकारी शैलेश हिंगे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे मुळा लाभक्षेत्राच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील प्रवरा लाभक्षेत्राचे स्वप्निल काळे निळवंडे प्रकल्पाचे अभियंता कैलास ठाकरे कार्यकारी अभियंता कैलास हापसे