श्रीरामपूर दि.१८ जनता आवाज वृत्तसेवा:-
सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून आयोजित केले जाणारे उपक्रम सेवा आणि समर्पण भावनेचा संदेश देणारे असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातीर मूक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.तसेच विद्यार्थी पालक पदाधिकारी नागरीकांच्या उपस्थितीत मंत्री विखे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात याप्रसंगी विश्वस्त सुरेशराव बनकर भाजपाचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर तालुका अध्यक्ष दिपकराव पठारे ओबीसी आघाडीचे प्रकाशराव चिते नानासाहेब शिंदे शरदराव नवले गिरीधर आसने नितीन भागडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.दिपक बारहाते समीर सय्यद विलास भालेराव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,कोणताही उपक्रम सामाजिक बांधिलकी ठेवून केला गेला तर त्याचे महत्व अधिक मोठे होते.या मूक बधीर विद्यार्थ्याकरीता आजचा उपक्रम त्यादृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,त्यांच्या या कार्यक्रमातून अनेक नाविन्यपूर्ण कार्याची माहीती समोर येते.सामाजिक बांधिलकीचा संदेश हा सेवा आणि समर्पणाच्या भावनेत आहे.पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या संदेशाचे अनुकरण कृतीतून व्यक्त होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या संस्थेकरीता सौर उर्जा प्रकल्प मंजूर करण्याच्या केलेल्या मागणीबाबत मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मकता देवून याचा प्रस्ताव तातडीने गटविकास अधिकारी यांना तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा १०२ वा भाग आज मंत्री विखे पाटील यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरीकांच्या उपस्थितीत पाहीला.आजच्या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणी कार्यक्रमाचा आवर्जुन उल्लेख केला.याचे सर्व उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून स्वागदिल्या.
शहरातील दिपक चव्हाण यांनी मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शासनाच्या विविध योजनांच्या नोंदणी करीता आयोजित केलेल्या शिबीरास भेट देवून शुभेच्छा दिल्या.