9.9 C
New York
Thursday, November 28, 2024

Buy now

spot_img
spot_img

लोणी मध्ये प्रथमच बिबट्याच्या हल्ल्यात ९  वर्षीय बालक  अथर्व प्रवीण लहामगेचा मृत्यू लोणी परिसरात खळबळ वनविभागाच्या गलथान कारभारामुळे निष्पाप बालकाचा बळी 

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता  तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर भर वस्ती असलेल्या ठिकाणी काल सायंकाळी ६ : ३०  ते ७  च्या दरम्यान अथर्व प्रवीण लहामगे या ९  वर्षीय  बालकांचा बिबट्याने हल्ला केल्यामुळे मृत्यू झाला आहे.  

लोणी बुद्रुक येथील  प्रवरा ग्रामीण रुग्णालय समोर  गोसावी वस्तीवर राहत असलेल्या लहामगे कुटुंबातील प्रवीण लहामगे यांचा मुलगा सायंकाळी संदीप नवनाथ गोसावी यांच्या घरी खेळण्यासाठी गेला त्यानंतर संदीप नवनाथ गोसावी यांचा मुलगा गणेश संदीप गोसावी हे दोघे सोबत दूध आणण्यासाठी गेले. दूध घेऊन आल्यानंतर संदीप गोसावी यांचा मुलगा गणेश हा घरामध्ये दूध देण्यासाठी गेला. त्यानंतर त्याने बाहेर येऊन बघितले असता अथर्व त्याला तेथे दिसून आला नाही. त्याला वाटले की अथर्व हा घरी गेला. त्यानंतर अथर्व प्रवीण लहामगे यांच्या घरच्यांनी संदीप गोसावी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की अथर्व घरी आला नाही. गोसावी कुटुंबाने सांगितले की अथर्व घरी जाऊन खूप वेळ झाला आहे. त्यानंतर लहामगे कुटुंबीयांनी अथर्वचा शोध घेतला असता अथर्व हा रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास संदीप नवनाथ गोसावी यांच्या मालकीच्या मकाच्या शेताच्या मध्यभागी गंभीर जखमी अवस्थेत सापडला.

अथर्वला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व मयत झाला. लोणी मध्ये प्रथमच अशी घटना घडली आहे. या घटनेमुळे लोणी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. लहामगे कुटुंब ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरातील नागरिकांनी वन विभागाला पिंजरा लावण्याची वारंवार मागणी केली होती. सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच कोपरगाव वनविभाग परिक्षेत्राचे वन अधिकारी सागर केदार यांनी घटना ठिकाणी धाव घेऊन घटनेची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले.

लोणी बुद्रुक व लोणी खुर्द या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा दिसत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वनविभागाचे अधिकारी यांना वारंवार सांगूनही कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी घेतली नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांचा वनविभागा बद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. वन विभागाने योग्य वेळी जर  पिंजरा लावला असता या निष्पाप मुलाचा बळी गेला नसता.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!