लोणी दि.१५( जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधीनिर्मानशास्त्र महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीर दुर्गापूर येथे सुरू झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संजय भवर यांनी दिली.
या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी पद्यश्री डाॅ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे पाटील हे अध्यक्षस्थानी तर दुर्गापूरचे सरपंच नानासाहेब अण्णासाहेब पुलाटे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.१५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२४ या सात दिवसाच्या विशेष हिवाळी शिबिरात स्वयंसेवाकांनी रोज परिपाठ, प्रार्थना, स्वच्छता,श्रमदान, स्वयंपाक, अमृतवाणी, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम,आरोग्यविषयक जनजागृती, पथनाट्य, वृक्षरोपण, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, जल संवर्धन, मोफत हिमोग्लोबिन रक्त गट तपासणी शिबीर तसेच गड आणि किल्ले संवर्धन इत्यादी कामे होणहर आहेत.
महात्मा गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे ‘ खेड्याकडे चला ‘ या युक्ती प्रमाणे सर्व स्वयंसेवकांनी दुर्गापूर या खेड्याचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी हे आरोग्य सेवा पुरवठादार असून त्यांनी गावातील लोकांना भ्रमणध्वनी चे सदुपयोग आणि दुरुपयोग याबद्द्ल जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विशेष नेत्र आणि दंत चिकित्सा शिबीर या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आले आहे .
या शिबिरात विविध विषयांवरती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना स्वशिस्त, श्रमसंस्कार, नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास, स्वच्छता, इत्यादी मूल्यांचा याचे अनुकरण करण्यास मिळेल.
या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच नबाजी रोकडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष कचरी पुलाटे,पोलिस पाटील दिलीप पुलाटे ,सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब पुलाटे गंगाधर मनकर, दादासाहेब मनकर,वेणूनाथ पुलाटे इत्यादी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ.मयुर भोसले, डॉ.सोमेश्वर मनकर , डॉ. सुहास सिद्धेश्वर , डॉ.संतोष दिघे आणि प्रा.राजश्री घोगरे हे प्राध्यापक विशेष परिश्रम घेत आहे. तर चि. कार्तिक नेहे व कु.अक्षदा जावळे यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.