वरळी (जनता आवाज वृत्तसेवा):- वरळीच्या एनएससीआय डोम येथे शिवसेना ठाकरे पक्षाचा राज्यव्यापी मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून सहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे. साधारण दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचा वरळी येथे राज्यव्यापी मेळावा
सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी शिबिरासाठी एकत्रित येत असल्याने या शिबिराला एक वेगळं महत्त्व असणार आहे. उद्धव ठाकरे या पदाधिकारी शिबिरामध्ये शिंदे फडणवीस सरकारवर कशाप्रकारे टिकेचे बाण सोडतात? सोबतच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना कोणता संदेश देतात याकडे लक्ष आहे.
शिबिराचा कार्यक्रम असा असेल
शिबिराच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
पहिल्या सत्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोविडवर जी यशस्वी मात केली त्यावर ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार आहे.
त्यानंतर शिवसेना नेते सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी संगीतकार राहुल रानडे आणि सहकलाकार ‘शिवसेनेचा पोवाडा’ सादर करतील.
त्यानंतर अंबादास दानवे, संजय राऊत यांची भाषणे होतील.