29.6 C
New York
Tuesday, August 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिर्डी: जीव देण्यासाठी वीज ट्रान्सफार्मवर चढला मात्र, ऐनवेळी वीज गेल्यानं जीव वाचलाय.

शिर्डी:  विद्युत रोहित्र वर चढलेल्या माथेफिरूला सुखरुप खाली
उतरवण्यात अग्नीशमन विभागाला यश आलय.. शिर्डीतील आरबीएल बॅंक चौकात
असलेल्या अकरा केव्ही वरील विद्युत ट्राम्सफार्मवर एक माथेफिरु आत्महत्या
करण्याच्या उद्देश्यान चढला.. मात्र त्याचे दैव बलवत्तर म्हणून त्याच वेळी
कोपरगावहून येणारी 132 मुख्य विद्युत वाहिनीला ट्रपिंग झाली अन त्याचा जीव
वाचलाय..

तब्बल अर्धा ते पाऊनतास ह्या माथेफिरूननं सर्वांना वेठीस धरल मात्र
त्यानंतर नगर परिषदेच्या अग्नीशमन विभागान त्याला सुखरुप खाली उतरवलय..
हा माथेफिरू जीव देण्यासाठी रोहित्रावर चढला पण त्याच वेळी मुख्य
वाहीनी ट्रीप झाली होती त्यामुळे त्याचा जीव वाचला.. महत्वाच म्हणजे अकरा
केव्ही सुरु करण्या आधीच शिर्डी विद्युत सबस्टेशनला काही नागरिकांची माहीती
दिल्यान मोठा अनर्थ टळलाय.. संबधित व्यक्तीला त्याच्या नातेवाईंच्या
ताब्यात देण्यात आलेय तर विज वितरण कंपनी पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे..
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!