10.6 C
New York
Wednesday, November 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने अनोख्या स्पर्धेचे आयोजन..

अहमदनगर( जनता आवाज वृत्तसेवा ):-अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या अंतर्गत २२ जानेवारी २०२४ रोजी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी सुंदर असे उपक्रम राबवून रांगोळी, सजावट, देखावा, चित्र साकारून स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी राबविलेल्या उपक्रमाचा फोटो तसेच सदरील उपक्रमासोबत आपला सेल्फी असे दोन छायाचित्र आपल्या तालुक्यासाठी देण्यात आलेल्या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवणे बंधनकारक असणार आहे. तसेच आपले नाव, गाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक देखील यामध्ये असणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धकाने राबविलेल्या उपक्रमाचा फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून @drsujayvikhe या अकाउंटला टॅग केल्यास अतिरिक्त गुण देखील मिळणार आहेत. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी असणार आहे.

या स्पर्धेंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक गावामधून एक विजेता तर शहरी भागातील प्रत्येक प्रभागातून एक विजेता निवडण्यात येणार आहे आणि या विजेत्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना अयोध्येला जाण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अहमदनगर शहर – ८२३७९४००८१, अहमदनगर तालुका – ७७०९५३००८२, श्रीगोंदा तालुका – ८१४९५३००८४, कर्जत तालुका – ७३८७१४००८५, शेवगाव तालुका – ७२४९१४००८७, राहुरी तालुका – ७२४९५९००८३, जामखेड तालुका – ८६२४०७००८९, पाथर्डी तालुका – ७०२८८९००८६, पारनेर तालुका – ७०२८७४७०८८ या तालुकानिहाय व्हाट्सॲप क्रमांकावर वरीलप्रमाणे देण्यात आलेली माहिती पाठवायची आहे व सर्वांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

याशिवाय अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी दि. २१ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत उत्साहात हा आनंदोत्सव साजरा करावा असे देखील त्यांनी सांगितले.

प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गावातील सर्व मंदिरांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई करावी. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची सकाळी प्रभातफेरी काढून रामनामाचा जयघोष करावा. तसेच सर्व घरांवर गुढ्या उभारून भगवे ध्वज फडकवावेत व दिवे लावावेत आणि महिला मंडळाच्या माध्यमातून सामूहिक रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्याचे आवाहन खासदार सुजय विखेंनी जनतेला केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!