18.6 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

धांदरफळ खुर्द येथील तरुणाची दहाव्या दिवशी मृत्यूची झुंज अपयशी ठरली मुंबई येथील केम रुग्णालयात धांदरफळ खुर्द डीजे प्रकरणातील तरुणाचा झाला मृत्यू

संगमनेर ( जनता आवाज  वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे नवरदेवाच्या मिरवणुकीत डी जे च्या चाकाखाली चिरडून अभिजीत उर्फ गणेश संतोष ठोंबरे हा तरुण गंभीरित्या जखमी झाला होता. त्याच्यावरती मुंबईत एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता अखेर दहाव्या दिवशी त्याची मृत्यूशीझुंज अपयशी ठरली. आणि आज सोमवारी दहाव्या दिवशी पहाटे त्याचा मृत्यू झाला . त्यामुळे धांदरफळ घटनेतील मृतांचीसंख्या तीनवर जाऊन पोहोचली आहे

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील किसान खताळ यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने मिरवणूक सुरू होती. त्याचवेळी अचानक मिरवणुक सुरू होती घुसल्याने सहा ते सात जण चिरडले गेले त्यात बाळासाहेब खताळ आणि भास्कर खताळ या दोघांचा डीजेच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला होता. तर अभिजीत ठोंबरे हा गंभीरित्या जखमी झाला होता त्याच्यावर संगमनेर येथील मेडिकेव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक बनली त्यामुळे त्याला तात्काळ नाशिकला हलविण्यात आले .परंतु त्याची प्रकृती सुधारत नव्हती त्यामुळे त्याला मुंबईला हलविण्यात आले होते मुंबई येथील के ई एम या नामांकित रुग्णालयात त्याच्यावर आठ दिवसापासून उपचार सुरू होते.तेव्हापासून सोमवार पर्यंत त्याची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र आज सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्या च्या सुमारास त्याला रक्ताची उलटी झाली अन त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. मुंबई हून त्याचा मृतदेह गावात आणला जाणार आहे.या दुर्दैवी अपघातात धांदर फळ खुर्द मधील तिसरा बळी गेल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!