नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा)तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नीट व सीईटी परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा महाविद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुणवत्तेची उत्तुंग भरारी घेतल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, काकासाहेब गायके, लक्ष्मणराव जगताप ,रवींद्र जोशी, अंबादास इरले ,कुलगुरू डॉ अशोकराव ढगे, प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापुरे ,उपप्राचार्य गोवर्धन आयनर सर, पर्यवेक्षिका राधा मोटे यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
सभापती नंदकुमार पाटील बोलताना असे म्हणाले की श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाची शैक्षणिक यशोगाथा वृद्धिंगत व्हावी म्हणून ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नीट व सीईटी परीक्षेसाठी प्रोत्साहित केले जाते. त्यात आमदार शंकरराव गडाख, मुळा एज्युकेशनचे उपध्यक्ष उदयन गडाख यांची शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची भूमिका असते व सातत्याने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा असो की इतर कुठल्याही परीक्षा असो आमदार शंकरराव गडाख व उदयन गडाख हे नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात म्हणूनच आज या परीक्षेत विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर व जिद्दीवर घवघवीत यश संपादन करून नेवाशाचे नाव उज्वल केले.
त्यानंतर रावसाहेब कांगुणे यांनी बोलताना असे म्हटले की नीट व सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या सुवर्ण काळाकडे नेणाऱ्या असतात. यात विद्यार्थीनी अहोरात्र मेहनत घेतल्यानंतर यश पदरात पडते. विद्यार्थ्यांना कुठेतरी पाठबळ व शाब्बासकी मिळावी यासाठी या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार कॉलेजच्या वतीने आयोजित केला तसेच त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पालकांचाही मोलाचा वाटा आहे म्हणूनच उद्याचे होणारे डॉक्टर व इंजिनिअर यांचा सत्कार करताना मला खूप आनंद होत आहे.
याप्रसंगी अनिकेत कदम, श्रावणी चौधरी, अंगद सचदे ,साक्षी कोतकर, वैष्णवी घोरपडे, श्रुती बर्डे , प्राजक्ता खरात, ऋतुजा फोपसे, श्रेया जाधव या गुणी नीट व सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.