10.1 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

spot_img
spot_img

खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांना यश..

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा ):- वांबोरी चारीतील २५ लाखांचे लाईट बिल थकीत होते. हे लाईट बिल खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांमुळे एमएसईबीच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. 

वांबोरी चारीचे जर ३ पंप चालू असले तर सुमारे ०१ कोटीच्या आसपास महिन्याचे लाईट बिल येत असते. त्यामुळे लाईट बिल थकल्याचे समोर आले. दरम्यान उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय २२ ऑगस्ट २०२३ नुसार अतिउच्च दाब, उच्च दाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेंतर्गत ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यास शासनाने मुदतवाढ दिल्याने वांबोरी चारीचे ०२ महिन्याच्या लाईट बिलामध्ये एकूण ०१,०९,७५,९४५ कोटी इतकी सबसिडी शासनाने दिलेली आहे. या सबसिडीमुळे नोव्हेंबर महिन्याचे करंट बिल ११,०३,७७४.४० रुपये व डिसेंबर महिन्याचे करंट बिल २३,९४,१८० रुपये इतके कमी प्रमाणात आलेले आहे.

तसेच कार्यकारी संचालक, गोदावरी विकास महामंडळ यांच्या कार्यालयाकडे योग्य तो पाठपुरावा केल्याने वांबोरी चारीचे चालू विद्युत देयक भरण्यासाठी २५ लक्ष इतकी रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे वांबोरी चारीचे महावितरणकडून तोडण्यात आलेले वीज कनेक्शन जोडण्यात आले असून आता वांबोरी चारी पुन्हा चालू होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!