12.4 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

spot_img
spot_img

पंतप्रधान मोदींच्या स्टार्ट अप धोरणामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या संधी- डाॅ अमित रंजन  प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्टार्ट अप डे संपन्न

लोणी दि.१७( जनता आवाज वृत्तसेवा ):-देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केलेल्या राष्ट्रीय स्टार्ट अप योजनेतून उद्योजकतेला मोठी चालना मिळत असून या माध्यमातून युवकांनी स्व :ताला उद्योजक व्हावे. नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे व्हा असा सल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत अटल इंक्युबॅशन सेंटरचे मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. अमित रंजन तिवारी यांनी केले.

राष्ट्रीय स्टार्टअप डे निमित्ताने आयोजित कार्यक्रमास वेळी डॉ. एस. एम. नलवाडे,इ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विभाग प्रमुख डाॅ.एस.एम.नलावडे, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डाॅ.राहुल पाटील, भारत घोगरे, प्राचार्य डॉ संजय गुल्हाने, पीआरसी रिसर्च इनोवेशन स्टार्टअप आणि मेडियम इंटरप्राईजेस (प्रिझम) फोरम कंपनीचे सीईओ तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. संजय कुरकुटे, डॉ. एस. बी मगर, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. अमित रंजन तिवारी यांनी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सुरु केलेल्या स्टार्ट अप योजनेची माहीती देतांना नावीन्य पूर्ण अशा उद्योगांना या योजनेतून मोठी संधी आहे. युवकांनी गावपातळीवर त्यांच्याकडे असलेल्या संकल्पना कृतीतून उद्योगाकडे नेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. संशोधनाला चालना या माध्यमातून मिळते. केवळ इंजिनिअर न होता उद्योजक होऊन नोकरी न मागता नोकरी देणारे व्हा.असा सल्लाही त्यांनी दिला. स्टार्ट अप ची नोंदणी प्रक्रिया आणि उभारणी, अर्थसहाय्य याविषयी माहीती देतांनाच महीलांना स्टार्ट अप मध्ये मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. संजय कुरकुटे यांनी स्टार्ट अप उभारणी साठी महाविद्यालयात सुरु असलेल्या उपक्रमाची माहीती दिली.प्रिझम फोरम या कंपनीच्या माध्यमातून इनोवेशन इंक्युबॅशन सेंटर साठी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष मार्गदर्शनाखाली.या इनोवेशन इंक्युबॅशन सेंटरमध्ये एम एस एम इ अंतर्गत महिला इंक्युबॅशन योजनेसाठी २५ स्टार्टॲपला रजिस्ट्रेशन करण्यात आले.तसेच कृषी विभागाच्या अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ विविध स्टार्ट अप साठी प्रवरा परिसरात संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

प्रारंभी प्राचार्य डॉ संजय गुल्हाने यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सचिन निंबाळकर यांनी केले.

ग्रामीण भागातील युवकांना सखोल माहीती मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – अटल इंक्युबॅशन सेंटर, छत्रपती संभाजीनगर आणि प्रृवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी मध्ये सामंजस्य करार ही यावेळी करण्यात आला.प्रिझम फोरम या कंपनी अंतर्गत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये खालील स्टार्टअप करण्यात आले.एसटीडीएफ, एस एन जी ओ प्रायव्हेट लिमिटेड, प्राईम प्रायव्हेट लिमिटेड, भूमी सर्च इंजिन.पुढील काळामध्ये प्रवरा परिसरामध्ये सर्व स्टार्ट अप साठी इंक्युबॅशन इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून प्रिझम फोरम या कंपनीद्वारे मार्गदर्शन आणि विविध योजनेचा फायदा घेता येईल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!