10.2 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

spot_img
spot_img

आ शंकरराव गडाखांच्या पुढाकाराने माऊली आश्रमाचा कायापालट. ह भ प ज्ञानेश्वर महाराज हजारे पिचडगावात सभामंडप व रस्त्याचे लोकार्पण.

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पिचडगाव ता नेवासा येथील आ शंकरराव गडाख यांच्या निधीतून करण्यात आलेल्या माऊली आश्रम पिचडगाव सभामंडप व रस्ता कामाचे लोकार्पण महंत प्रकाशानंदगिरी महाराज,गणेशानंदगिरी महाराज,ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या हस्ते व आ शंकरराव गडाख ,मा आ पांडूरंग अभंग यांच्या उपस्थितीत मंगळ दि 16 जाने 2024 रोजी संपन्न झाले.माजी आ पांडुरंग अभंग म्हणाले सत्ता असो वा नसो आ शंकरराव गडाख नेहमी विकासकामांसाठी प्रयत्नशील असतात.

याप्रसंगी बोलतांना ह भ प ज्ञानेश्वर महाराज हजारे म्हणालेआ शंकरराव गडाख हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत.माऊली आश्रमास गेल्यावर्षांपूर्वीआ गडाख यांनी भेट दिली होती आम्ही त्यांच्याकडे रस्ता कामाची व सभामंडपाची मागणी केली होती त्यावेळी आ गडाख यांनी सदर काम मार्गी लावूनच आश्रमास भेट देणार असल्याचा शब्द दिला होता व तो शब्द त्यांनी पाळला याबद्दल त्यांनी आ गडाख यांचे आभार मानले.

धार्मीक कामात नेहमी त्यांचा पुढाकार असतो.शेतकऱ्यांपासून ते वारकऱ्यांपर्यत सर्वांच्या सुख दुःखात आ गडाख हे सहभागी असतात. पिचडगाव व परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊली महाराज आश्रमास सभामंडप व रस्ता काम मार्गी लावल्यामुळे आ शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातुन माऊली आश्रमाचा कायापालट झाला आहे.

विकासकामाबरोबरच आ गडाख यांनी आश्रमास रोख देणगीही दिली असे ज्ञानेश्वर महाराज हजारे म्हणाले.याप्रसंगी बोलतांना आ शंकरराव गडाख म्हणाले माऊली आश्रमाचे कामे करता आले याचे मनाला समाधान आहे.सभामंडप काम मार्गी लागल्यामुळे कार्यक्रमात भाविकांना उपयोग होणार आहे.

यापुढेही माऊली आश्रमाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न करणार असल्याचे आ गडाख म्हणाले.नेवासा तालुका ही संतांची भूमीआहे या धार्मिक भूमीत संत महतांच्या आशीर्वादाने विकासाचे काम करतांना कितीही अडचणी आल्या तरी करत राहणार असल्याचे आ गडाख यांनी सांगितले महंत प्रकशानंदगिरी महाराज यांची काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाली.

याप्रसंगी प्रकाशानंदगिरी महाराज,गणेशानंदगिरी महाराज,आ शंकरराव गडाख,माजी आ पांडुरंग अभंग यांची ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.याप्रसंगी त्रिंबक महाराज बोरुडे,मा सभापती रावसाहेब कांगुणे, सरपंच सतीश निपुंगे,बाबासाहेब आखाडे,भरत काळेआदींसह पिचडगाव,मुकींदपुर व परिसरातील नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ शंकरराव गडाखयांनी निधी दिल्याने माऊली आश्रमाचा सभामंडपाचा व रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.धार्मिक कार्यात आ शंकरराव गडाख यांचे नेहमी सहकार्य असते ते भूषणावह असेच आहे.

-:(ह भ प ज्ञानेश्वर महाराज हजारे)

(माऊली आश्रम पिचडगाव.)

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!