शिर्डी (जनता आवाज
वृत्तसेवा):- नुकत्याच जाहीर झालेल्या वैद्यकिय प्रवेश परीक्षा नीट 2022-23 चा निकाल जाहीर झाला. देशपातळीवरील या परीक्षेत साई निर्माण ज्युनियर कॉलेज, शिर्डी चे 3 विद्यार्थी घवघवीत यश संपादन करीत शासकीय वैद्यकीय प्रवेश यादीत झळकले आहेत.
यात कु. शिवानी पावसे हिने 720 पैकी 595, कु. आश्रय लोंगाणी याने 720 पैकी 593 व कु.ललित तोरणे याने 720 पैकी 402 गुण मिळवले.
या किर्तीमानाबद्दल संस्था अध्यक्ष श्री विजुभाऊ कोते पाटील, उपाध्यक्ष श्री ताराचंद कोते पाटील, संस्थेचे सर्व सन्मानिय संचालक, प्राचार्य श्री गणेश डांगे सर, मुख्याध्यापक श्री संदीप डांगे सर, सर्व शिक्षक व पालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला व पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या.