11.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

काळाने हिरावलेला दिग्विजयी हिरा सॉफ्ट वेअर इंजिनिअर दिग्विजय शिवाजी पुलाटे 

लोणी (जनता आवाज  वृत्तसेवा):- वीस वर्षांपूर्वी शंभर वर्षाची जुनी मैत्री असलेलेली सिद्ध योगी पुरुषांची चार गावे साईबाबांची शिर्डी मुकुंददास महाराजांचे दाढ बु मानमोडे बाबांचे प्रतापपूर व आनंदाबाबांचे दुर्गापूर .हे चार सिद्ध योगी अलौकिक वार्तलाप हितगुज करण्यासाठी कधी कधी एकत्र येत तो दाढ प्रतापपूर दुर्गापूर परिसर.त्यातील दुर्गापूर हे एक छोटे गाव.या गावात राहणारे मती मातीचा सुंदर मेळ घालत अध्यात्मिक शैक्षणिक व समाजिक क्षेत्रात अध्यात्म मार्गाने वाटचाल करणारे धोंडिबा विठोबा पुलाटे यांचे मती मातीची सेवा करत यशस्वी जीवन जगणारा सरळ साधा सुसंस्कृत तरीही लोकप्रिय परिवार.यामध्ये शैक्षणिक साहित्यिक समाजिक कृषी व अध्यार्मिक क्षेत्रात कार्यरत असणारी यशवंत शिवाजी नानासाहेब् व कविता ही निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईचा आदर्श जपणारी भावंड.यापैकी प्रा डॉ शिवाजी व उच्च विद्याविभूषित गृहिणी सौ जयश्री यांच्या पोटी १४ मे २००५ रोजी शिर्डी येथे डॉ जोशी हॉस्पिटल मध्ये एका मुलाचा जन्म झाला.

जन्मापासून तोळा मासा प्रकृती त्यामुळे शिक्षण घेताना अनेक अडचणी सर्दी दमा असा होणारा त्रास त्यामुळे आनंद गुरुकुल इंग्लिश मेडीयमच्य बसने प्राथमिक शिक्षण सुरुवात .तरीही आजार पिच्छा सोडत नसल्याने हे इंग्रजी आयुध इ ५ वी ला बाजूला ठेवून पद्मश्री विठ्ठलरावं विखे पाटील विद्यालयात मराठी वर्गात प्रवेश घेऊन माध्यमिक शिक्षण घेतले.त्यानंतर पद्मश्री विठ्ठलरावं विखे पाटील जयुनिअर कॉलेज येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.परंतु हे सर्व शिक्षण त्याच्या प्रकृतीच्या विरोधात म्हणजे स्मरणशक्ती आधाराचे त्यामुळे त्यात त्याला फारशी गती प्राप्त झाली नाही त्यामुळे सामान्यच नाही तर उत्तीर्ण होतो की नाही अशी स्थिती.इ १२ वी विज्ञान केवळ पासिंग करत पास झालेला हा विद्यार्थी.मेडिकल इंजिनिअरिंगचे बंद झालेले दरवाजे मूलभूत शाखा प्रवेशास त्याचा असलेला विरोध व नसलेली क्षमता.काय करावे कुटुंबा समोर मोठा प्रश्न उभा राहिला.शेती हा पारंपरिक व्यवसाय करावा तर तशी राकट प्रकृती नाही.पण इच्छा असेल तर मार्ग दिसेल हे अगदी खरे ठरविणारी महाराष्ट्र टाइम्स पेपर मधील कौशल्य विकासाचे ध्येय उराशी बाळगून केवळ प्रात्यक्षिकाच्या आधाराने रोजगार निर्मिती हे प्रगत देशात वापरले जाणारे विद्यार्थी व स्थानिक मनुष्यबळ विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या बाप कंपनीची बातमी वाचण्यात आली माहिती म्हणून भेट दिली तर या मुलाने तेथे प्रवेशाचा हट्ट धरला.नाविलाजाने कंपन कोलेज नवीन असल्याने विश्वास वाटत नसताना प्रवेश घ्यावा लागला.

शिक्षण व कौशल्य हातात हात घालून या मुलाला पुढे नेऊ लागले.वर्ष संपले आणि तो आतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञानाची भाषा बोलू लागला त्यातील कोडींग डेटा प्रोग्रॅमिंग हे पूर्णतः नवे असलेले शब्द व संदर्भ तो सहज उलगडू लागला व ते माझ्या सारख्या इंजिनिअरिंग झालेल्या माणसाला समजून देऊ लागला.दुसऱ्या वर्षी तर त्याचे बोलणेच बदलले तो अँप डेव्हलपमेंट विषयी बोलू लागला व अचानक एक दिवस सर्व विद्यार्थी सुट्टी घेऊन कुठे लांब ट्रिपला जाणार असल्याचे बोलला पण मला थंडीमुळे जायचे नाही मला लवकर सर्दी होतो असे म्हटला.त्याचे कारण कळले तेंव्हा मला खूप आनंद झाला कारण या सर्व मुलांनी स्वतःचे एक कोटीचे अँप तयार केले होते व त्याचे सिलेब्रेशनसाठी ते ट्रिप करत होते.पण हा मुलगा प्रकृती करणाने टीम लीडर असून देखिल जाऊ शकला नव्हता. त्यात लपलेला मी मला जाणवत होता कारण पात्रता मिळविता येते पण क्षमता असावी लागते. आज मी व्यासपीठ पात्रता मिळविली पण क्षमता नसाल्याने इतर दोघांच्या पायाने म्हणजे चार पायाने व्यासपीठावर जावे लागते.या अर्थाने आम्ही चुलते पुतणे समसुखी नात्याचे होतो. अतिशय मितभाषी असल्याने कधी तरी बोलायचा फोनवर पण बोलताना हल्ली खूप आत्मविश्वास पूर्ण बोलायचा. असंच बोलताना आम्ही शेतकऱ्यांना उपयोगी होईल असे महत्वाचे अँप् तयार केल्याचे बोलला.

तेंव्हा मला फार आनंद झाला कारण माती व माणसे हा माझा आवडीचा विषय.परवा त्याला त्याच्या वडिलांनी असाच सहज फोन केला. तेंव्हा त्याने जेवण झाले सर्व व्यवस्थित आहे व मला उद्या एका अँपचे प्रेझेंटेशन सेमिनार अकोला येथे आहे. मला व आमच्या कंपनीतील इतरांना जायचे आहे असे बोलला वेळ ९.३७ ते १०.४ दरम्यान रात्री सर्वांना समाधान वाटले. झोपण्याची तयारी सुरु होती आणि पुन्हा १०.२०वा कंपनीतून फोन आला त्याला चक्कर येऊन तो जिन्याच्या खालच्या शेवटच्या पायरीवरून खाली पडला आम्ही त्याला इथापे हॉस्पिटल मध्ये नेत आहोत तुम्ही या लवकर.आम्ही सर्व निघालो आकरा वाजता पोहचलो तोवर त्यांनी त्यास मेदिकोअर मध्ये शिप्ट केले होते जाऊन पाहिले तर जवळ जवळ सर्व संपले होते.आणि हा मुलगा म्हणजे आमचा दिग्विजय उर्फ मोठ्यांचा लाडका सोनू तर लहानांचा गोड सोनू दादा होता.घरी आला की बँकेची व इतर कामे आवडीने करायचा कोणाशी फार न बोलण्याचा स्वभाव पण त्याच्या आवडीच्या विषयावर म्हणजे सॉफ्ट वेअर हार्ड वेअर यावर काम करणारा इंजिनियर म्हणून आत्मविश्वासाने मनमोकळे बोलणार. त्यामुळे त्याने कामावलेले मित्र व शिक्षकांचे प्रेम हे बाप कंपनीचे निशब्द झालेले दोनशे विद्यार्थी व हमसून हमसून रडणारे राव सर घुगे सर पाहून कधीही न रडणाऱ्या माझा बांध फुटला.त्याचे एकूण वीस वर्षाचे अल्पयुषी जीवन व मिळविलेले यश यांचे अवलोकन करताना एक गोष्ट स्पष्ट होते की कौशल्य क्षमता व समाजिक संधीच्या सुयोग्य संयोगाने उज्वल पात्रता निर्माण करता येते हा प्रगत देशातील विकासाभिमुख विचार आंमलात आणण्याची गरज असल्याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे दिग्विजयचा जीवनप्रवास होय. आमचा दिग्विजय म्हणजे आमचा उजवा हात म्हणणारे रक्ताच्या नात्यापलीकडील दिग्विजयचे शिल्पकार रावसर व बाप कंपनी यांचे दुःख आमच्यापेक्षा मोठे आहे कारण त्यांनी पैलू पाडलेला त्यांचा म्हैसूर युनिव्हरसिटीचा बीसीए आय टी

दुसऱ्या वर्षाचा गुगल राउंड क्रॅक करणारा हा हिरा काळाने सर्वांच्या समक्ष हिरावून नेला.श्री साईबाबाच्या शिर्डीत जन्मलेला हा दिग्विजयरुपी कृपा प्रसाद दिग्विजयी होत असताना मानमोडे बाबांच्या तालुक्याच्या संगमनेर या तालुक्याच्या गावी आनंतात विलीन झाला. हा त्याच्या साईभक्त मातेसाठी आश्चर्याचा मोठा धक्का आहे. पण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला हेच यातून अनुभवास येते.

वयस्करांना शांती लाभावी म्हणून प्रार्थना करावयची असते पण दुर्दैवाने अल्पयुषी छोट्या दिग्विजयला यशस्वी भव असा आशीर्वाद देण्या ऐवजी परमेश्वराने त्यास सदगती द्यावी अशी दयाघन पांडुरंग चरणी मनोभावे प्रार्थना.व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची दुर्दैवी वेळ गावावर परिवारावर आली.

शब्दांकन :-यमन पुलाटे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!