कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):- जय मल्हार यशवंत सेना अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सन 2023 या वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व उत्सव राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील प्रा. डॉ अशोक बिडगर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
डॉ. अशोक धोंडीबा बिडगर यांच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.डॉ. बिडगर यांनी नुकतेच केरळचे महामहीम राज्यपाल डॉ.अरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अभ्यास हे पुस्तक दिनांक 11/ 8/ 2022 रोजी प्रकाशित केले आहे. लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात डॉ. बिडगर हे इतिहास विभाग प्रमुख आहेत.
त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील धनगर समाजाचा शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक विकास या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी पदवी नुकतीच प्राप्त केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील धनगर समाजाचा शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक विकास या विषयावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील धनगर समाजाचा शैक्षणिक व राजकीय विकास या विषयावर पुणे विद्यापीठाचा मायनर संशोधन प्रकल्प पूर्ण केलाआहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इतिहास विषयातील एम. फिल व पीएच.डी चे मान्यता प्राप्त संशोधन मार्गदर्शक आहेत. यशस्वी घोडदौड या मासिकाचे सहसंपादक आहे. त्यांनी अनेक विषयावर शिवव्याख्याने व सामाजिक प्रबोधन पर व्याख्याने दिलेली आहेत.
तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये त्यांनी संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या वरील कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.लक्ष्मणराव मतकर अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर व यशवंत सेना जिल्हाध्यक्ष श्री विजय तमनर, यशवंत सेना शहराध्यक्ष श्री कांतीलाल जाडकर या मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील ,खा.सुजय दादा विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मा. ना.सौ शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील ,लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.पी.एम दिघे यांनी अभिनंदन केले आहे.