24.4 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

विकासाच्या माध्यमातून नागरिकांशी बांधिलकी कायम-सौ.शालीनीताई विखे पाटील चितळी येथे विविध कामांचा भूमिपूजन व उद्घाटन

राहाता दि.१८( जनता आवाज वृत्तसेवा ):-राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात चौथी विखे पाटील कुटुंबातील पिढी काम करत असताना,सत्ता असो किंवा नसो नागरिकांशी बांधिलकी कायम राहिली आहे.सरकार मध्ये असताना जे जे खाते मिळाले त्याचे सोने करून कायापालट करून,विकास कामाचा डोगर उभा करताना गट-तटाचे राजकारण केले नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

चितळी (ता.राहाता) येथील राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत पाणी साठवण तलाव व पाण्याची टाकी सुमारे दोन कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेचे व सव्वापाच कोटी रुपये विविध विकास कामाचे भूमिपूजन व उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब वाघ होते.

यावेळी बोलताना सौ.विखे पाटील म्हणाल्या की,विखे पाटील कुटुंबातीने नेहमी विकास हाच ध्यास घेऊन काम केले.येथील शेतकरी वर्गाचा असलेला जिव्हाळ्याचा निळवंडे व गोदावरी कालव्याच्या व पोटचाऱ्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले असून,उर्वरीत विकास कामांना तळ्याच्या वाल कंपाउंड साठी निधी निश्चित उपलब्ध करण्याची ग्वाही दिली.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अॅड.अशोकराव वाघ यांनी मनोगत व्यक्त करून,निळवंडे धरणाच्या पोटचाऱ्याचा कामे प्राधान्याने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी केली.

कार्यक्रमास यावेळी जिल्हा परिषद च्या माजी सदस्य कविता लहारे, पंचायत समितीच्या सदस्य अर्चना लहारे,माजी उपसभापती अलकाताई वाघ,चितळी च्या उपसरपंच कविता पगारे,ऍड.अशोकराव वाघ,खा.सुजय विखे पाटील मंच चे अध्यक्ष शैलेश वाघ, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पठारे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुंजाळ,चव्हाण,इंजिनिअर धापटकर, पाणीपुरवठा चे पिसे,वाघमारे बचत गटांच्या रुपाली वाघ,सेवा सोसायटीच्या नंदाताई वाघ,सेवा सोसायचे चेअरमन रेवनाथ वाघ,पत्रकार विष्णू वाघ,शिवाजी वाघ,व्हा.चेरमान संदीप वाघ,माजी उपसरपंच सोनाली वाघ,विलास वाघ ग्रामपंचायत सदस्य राजू वाणी,सुवर्णा माळी, दत्तात्रय सुसरे,विक्रम वाघ,सोनाजी पगारे,काळे प्रतिष्ठान चे दीपक वाघ,नंदू मामा गायकवाड,रवींद्र वाघ,रमेश वाघ,सुभाष वाघ,बाळासाहेब वाघ,सोपान वाघ,रमेश वाघ,शिवाजी कदम,रुपेश गायकवाड,रमेश जाधव,जीवन वाघ, मजिनाथ वाघ,सुरेश वाघ,संभाजी तनपुरे, सुभाष तनपुरे, अनिल वाघ,ग्रामविकास अधिकारी मधुकर आंग्रे आदी उपस्थित होते.प्रास्तविक पत्रकार विष्णू वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन सेवा सोसायटीचे संचालक रेवनाथ वाघ यांनी केले तर आभार शैलेश वाघ यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!