राहाता दि.१६ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-शिर्डी येथे अतिरीक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केल्याबद्दल राहाता वकील संघाच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहाणी करून अधिकार्याकडून कामाचा आढावा घेतला तसेच लवकर काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने सूचना केल्या.याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष नितीन विखे उपाध्यक्ष दिंगबर धनवटे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
यानिमिताने मंत्री विखे पाटील यांनी वकीलांशी संवाद साधला.शिर्डी येथे अतिरीक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर कार्यालय सुरू केल्याबद्दल वकील संघाच्या वतीने विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,प्रशासकीय कामासाठी नगर येथे जाणे सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने अवघड होते.यासाठी उतर नगर जिल्ह्याला स्वतंत्र अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे आशी अपेक्षा होती.योगायोगाने या विभागाचे मंत्रीपदच आपल्यकडे आल्याने हे कार्यालय मंजूर करता आल्याचे समाधान व्यक्त करून उतर नगर जिल्हयातील सर्वच तालुक्यांना याचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त करून, या निर्णयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
न्यायालयीन प्रक्रीयेसाठी वकीलांना नगरला जावे लागते.परंतू आता शिर्डी येथेच कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने वकीलांनाही कामकाजासाठी मोठी मदत होवून वेळ वाचणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.