श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला युती सरकारने मंजुरी दिल्याच्या निषेर्धात उद्या शनिवारी श्रीरामपूर बंद चे आव्हान स्वाभिमानी जिल्हा कृती समिती आणि श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन यांनी केले आहे.
राज्य मंत्रीमंडळाने दोन दिवसापूर्वी शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची मंजुरी दिली. त्याचे पडसाद श्रीरामपूर मध्ये उमटले, याची कारण म्हणजे जिल्हा विभाजनांचा श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे अशी श्रीरामपूर कर खूप दिवसापासून अपेक्षा धरून आहेत. परंतु मधल्या काही काळामध्ये संगमनेर हा जिल्हा होईल अशा वावड्या उठायला लागल्या. त्यामुळे श्रीरामपूर व संगमनेर असा वाद सुरू झाला होता. त्यामुळे हा वाद सुमारे अनेक वर्ष पूर्वीचा असल्यामुळे त्यामुळे जिल्ह्याचे मुख्यालय हे ठरत नव्हते.