लोणी दि.१९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):–खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, निर्णय क्षमता, सहानभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेळो इंडीया धोरणांमुळे खेळाची व्याप्ती वाढली असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते डॉ. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणीच्या पद्यश्री विखे पाटील कनिष्ठ महा विद्यालयात महाराष्ट्राचे महान खेळाडू आणि स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडाक्षेत्रातील योगदान बद्दल त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित मिनी मॅरेथाॅनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात सौ.विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास नाना तांबे, विखे पाटील कारखान्याचे संचालक बन्सी तांबे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,शिक्षण समन्वयक प्रा.नंदकुमार दळे,प्राचार्य डाॅ.अण्णासाहेब तांबे क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे,प्रा.बाबासाहेब वाणी,प्रा.बाळासाहेब दुर्गुडे,बाबासाहेब गाडेकर आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ.विखे पाटील म्हणल्या,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शिक्षणांसोबतचं खेळाला विशेष महत्व प्राप्त करुन दिले आहे निरोगी आरोग्यासाठी खेळास प्राध्याने द्यावे असे सांगितले.
डाॅ.प्रमोद विखे यांनी महाराष्ट्राचे महान खेळाडू आणि स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडाक्षेत्रातील योगदान बद्दल माहीती देत यानिमित्त सुरु असलेल्या उपक्रमाची माहीती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ.अण्णासाहेब तांबे यांनी केले.