3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

विविध रस्त्याच्या कामाची 22 पासून निविदा प्रक्रिया सुरू – आ. तनपुरे राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघातील विकास कामांना मंजुरी

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर -आगडगाव -कोल्हार कोल्हूबाई घाट रस्ता कामाची तसेच वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी -जेऊर- पिंपळगाव उज्जैनी रस्त्याची कामाची निविदा प्रक्रिया दि. २२ जानेवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

नगर तालुक्यातील पाथर्डी तालुक्याला जोडणारा महत्वाचा रस्ता कोल्हार घाट या रस्त्याच्या कामासाठी आमदार तनपुरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अर्थसंकल्पात तरतूद करून ८कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील कोल्हार शिराळ चिंचोडी आदि भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होत आहे. या भागातील जनतेची जिल्हाच्या ठिकाणी जाणे येणे करीता या रस्त्याची अत्यंत गरज होती. हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यामुळे आता नागरिकांची गैरसोय दुर होणार आहे. तसेच वडगाव गुप्ता पिंपळगाव माळवी ते गवारेवस्ती, जेऊर ते पिंपळगाव उज्जैनी यारस्त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीतून रु. २ कोटी २७ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून याचीही निविदा प्रक्रिया दि. २२ जानेवारी पासून सुरु होणार आहे. या रस्त्यांमुळे पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैनी, डोंगरगण मांजरसुंभा या गावांची गैरसोय दुर होणार असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगीतले.

कामाचे नांव अ.क्र.१ )अहमदनगर बुन्हाणनगर आगडगाव कोल्हार रस्ता प्रजिमा ४९ कि.मी १८/०० ते २१/५०० मध्ये सुधारणा करणे ता. नगर जि अहमदनगर. अंदाजीत रक्कम रुपये ३४७.८२ लक्ष २)अहमदनगर बुऱ्हाणनगर आगडगाव कोल्हार रस्ता प्रजिमा ४९ कि.मी १५/०० ते १८/०० मध्ये सुधारणा करणे ता. नगर जि अहमदनगर अंदाजीत रक्कम ३४८.९४ लक्ष,३) प्ररामा ८ ते वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी ते गवारे वस्ती ते प्ररामा-५ जेऊर ते पिंपळगाव उज्जैनी रस्ता प्रजिमा-१९० कि.मी १०/६०० ते १४/०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता नगर जि.अहमदनगर, अंदाजीत रक्कम २२७.२४ लक्ष रुपये असून या कामाच्या निविदा २२ जानेवारी २०२४ रोजी निघणार असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!