बेल्हे (जनता आवाज वृत्तसेवा):- पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर असे समजले जाते.समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत फॉरेन लाग्वेज क्लब अंतर्गत “जर्मन लँग्वेज ए वन लेवल सर्टिफिकेशन प्रोग्रॅम ” पूर्ण करण्यात आला.
उच्च शिक्षण विभाग,शिक्षण मंत्रालय, भारत सरकार च्या वतीने तयार करण्यात आलेल्या एन पी टी ई एल या ऑनलाइन सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर घेण्यात आलेल्या “जर्मन लँग्वेज ए वन लेव्हल सर्टिफिकेशन प्रोग्रॅम” या प्रमाणपत्र परीक्षेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग या विभागातील १४ विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केल्याची माहिती प्रभारी प्राचार्य प्रा.निर्मल कोठारी यांनी दिली. त्यापैकी अश्विनी देशमुख व रुचिता जगताप या विद्यार्थ्यांनी एलाईट या कॅटेगरीमध्ये विशेष प्राविण्य संपादन करून यश मिळवले.